Methichi patal bhaji recipe in marathi: अनेकदा मुलांना नाश्त्यासाठी तसेच डब्यासाठी काय द्यावं कळत नाही. मेथी, पालक, मुळ्याची भाजी याचं नाव जरी घेतलं तरी मुलं नाक मुरडतात. पण त्यांना आवडेल अशा पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर.. मेथीची सुकी भाजी आपण नेहमीच करतो. पण कधीतरी चेंज म्हणून अशी पातळ भाजी करून पाहा, तीदेखील सुद्धा खूप छान लागते. ही भाजी भातासोबतही खूप छान लागते. मुलांनादेखील ही भाजी नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया मेथीची पातळ भाजी कशी बनवायची ते…
साहित्य
- १ मेथीची जुडी
- १ टेबलस्पून तेल
- १/२ टीस्पून जीरे
- १०/१२लसणाच्या पाकळ्या ठेचून
- १/४ टीस्पून हळद
- चिमूटभर हिंग
- १/२ कप शेंगदाणे भाजलेले
- ४/५ हिरव्या मिरच्या तिखट
- चवीनुसार मीठ
कृती
मेथीची जुडी निवडून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून निथळत ठेवावी.
नंतर कढईत तेल गरम करून त्यात जीरे, लसणाची फोडणी करून घ्यावी. मेथी घालून मिक्स करावे.
हळद आणि हिंग घालून परतून घ्यावे. अर्धवट शिजवून घ्यावे.
शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. ही पेस्ट मेथीत घालून मिक्स करावे.
थोड पाणी घालून चवीनुसार मीठ घालून झाकून शिजवून घ्यावे.