हिरव्या मिरचीचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतं. अनेकजण जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरचीचा आस्वाद घेतात. आत्तापर्यंत तुम्ही मिरचीचं लोणचं, मिरची भजी, मिरचीचा ठेचा खाल्लाच असेल. काही लोकांना एकवेळ भाजी दिली नाही तरी चालेल पण ताटामध्ये लोणचे किंवा चटणी पाहिजेच. तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींची चव चाखायला आवडते का?आज आम्ही तुम्हाला मसाला मिरची कशी बनवायची हे सांगणार आहोत.अशी चटपटीत मिरची ताटात असल्यावर, जेवणाची लज्जत नक्कीच वाढणार. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी
अचारी मिर्च फ्राय साहित्य
- ७,८ मोठ्या आकाराच्या मिरच्या
- २,३ हिरवी मिर्च
- १ सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल
- चिमूटभर हिंग
- २ चम्मच,पंच मसाला घाला (आजवाईन, जिरे, कलोंजी, मेथी, सौफ आणि मोहरी)
- १/२, १/२ tsp हळद आणि धनेपूड,
- मीठ
- १ चमचा कोणतेही लोणचे
अचारी मिर्च फ्राय कृती
स्टेप १
प्रथम मोठ्या आकाराच्या मिरच्या स्वच्छ करा आणि धुवा. नंतर मधोमध कापून घ्या किंवा दोन भाग करा.
स्टेप २
नंतर तळण्याचे पॅन गरम करा आणि एक सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल घाला आणि नंतर त्यात चिमूटभर हिंग आणि पचं मसाला घाला. (आजवाईन, जिरे, कलोंजी, मेथी, सौफ आणि मोहरी). घाला.
स्टेप ३
तडतडल्यावर त्यात दोन चिरलेल्या मिरच्या आणि हळद आणि धनेपूड, मीठ घाला. मग एक चमचा कोणतेही लोणचे घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची टाका आणि नीट ढवळून झाल्यावर पॅनचे झाकण झाकून ठेवा.
हेही वाचा >> कोकणी पद्धतीचं झणझणीत चिकन सुक्का; रविवारी नक्की बेत आखा
स्टेप ४
तीन मिनिटांनंतर, ते ढवळून पुन्हा चार मिनिटे शिजवा ते सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तयार मिरची मसाला भाकरीसोबत सर्व्ह करा.