Misal Pav Recipe : मिसळपाव हा एक महाराष्ट्रीयन लोकप्रिय पदार्थ आहे. अत्यंत पौष्टिक स्नॅक म्हणून सुद्धा या पदार्थाला ओळखले जाते. कांदा, टोमॅटो आणि स्प्राउट्सपासून तयार केलेली मिसळ ही चवीला अप्रतिम वाटते. हा पदार्थ खरं तर महाराष्ट्रात अनेक शहरात सहज मिळतो. झणझणीत तिखट मटकीची उसळ, त्यावर फरसाण, त्यावर उसळीची तर्री व रस्सा, त्यावर टाकलेला बारीक चिरलेला कांदा, चवीला लिंबाची फोड आणि त्याबरोबर ताजा पाव, एकूनच तोंडाला पाणी सुटते. अनेकांना अतिशय प्रिय असलेली मिसळ तुम्ही कधी घरी बनवली आहे का? आज आपण घरी कुकरमध्ये झणझणीत मिसळ पाव कशी बनवायची , हे जाणून घेणार आहोत.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुकरमध्ये मिसळ कशी तयार करायची, हे दाखवले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

  • कांदा
  • टोमॅटो
  • खोबरे
  • तेल
  • लसूण आलं
  • लाल मिरची
  • हळद
  • गरम मसाला
  • काळ तिखट
  • हिंग
  • जिरे मोहरी
  • मिसळ मसाला
  • मीठ
  • मटकी कोथिंबीर

हेही वाचा : Egg Korma Recipe: नॉनव्हेज प्रेमींना हमखास आवडेल अशी झणझणीत ‘अंडा कोरमा रेसिपी’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

कृती

  • सुरुवातीला उभा बारीक कांदा चिरून घ्यावा.
  • त्यानंतर बारीक उभा कापलेला कांदा तव्यावर थोडं तेल टाकून परतून घ्यावा. त्या कांद्यावर बारीक किसलेले खोबरे टाका. ते सुद्धा चांगले परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाका. नीट भाजून घ्या
  • त्यानंतर त्यात थोडं आलं लसूण बारीक चिरून टाकावं. सर्व नीट परतून घेतल्यानंतर शेवटी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • हे सर्व भाजून घेतलेले मिश्रण मिस्करमधून बारीक पेस्ट करू घ्या.
  • त्यानंतर गॅसवर कुकर ठेवा.
  • त्यात तेल गरम करा.
  • सुरूवातीला त्यात जिरे आणि मोहरी टाका.
  • त्यानंतर कढीपत्ता टाका.
  • त्यानंतर सर्व भाजून घेतलेल्या मिश्रणाची ती पेस्ट टाका.
  • त्यानंतर त्यात लाल मिरची, हयळद, गरम मसाला, काळ तिखट,हिंग आणि मिसळ मसाला टाका.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • चवीनुसार मीठ टाका
  • त्यात मोड आलेली मटकी टाका. मिश्रण एकजीव करा
  • त्यानंतर त्यात थोडे पाणी टाका.
  • त्यानंतर कुकरचे झाकण लावा. एक शिट्टी होऊ द्या
  • शेवटी बारीक चिकलेली कोथिंबीर टाका.
  • तुमची मिसळ तयार होईल.
  • ही मिसळ तुम्ही पावबरोबर खाऊ शकता.

हेही वाचा : How To Make Soya Cutlet : सोयाबीन कटलेट कधी खाल्ले आहेत का? मग मुलांच्या डब्यासाठी नक्की बनवा; पटकन वाचा सोपी रेसिपी

पाहा व्हायरल व्हिडीओ

annapurna_amruta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कुकरमध्ये बनवा झणझणीत मिसळ पाव” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही अशीच मिसळ बनवतो फक्त मिसळ मसाला मटकी मोड वैगरे काहीच वापरत नाही आमचा घरचा मसाला कोल्हापूरी तिखट (चटणी )वापरतो नुस्त खा…की खा.. ” तर एका युजरने लिहिलेय, “वा खूप छान .!!” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज मी रिल पाहिली आणि लगेच करून पाहिली. खूप छान झाली रेसिपी.”