जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “मिक्स डाळवड्याची भाजी”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा मिक्स डाळवड्याची भाजी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिक्स डाळवड्याची भाजी साहित्य

  • २ वाटी मिक्स डाळीचे वडे
  • २ कांदे, २टोमॅटो बारीक कापलेले
  • १ इंच आलं सहा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचलेल्या
  • तेल
  • चवीनुसार मीठ सुपारी एवढा गुळ
  • थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली १५ कढीपत्त्याची पाने
  • १/२ चमचा हळद दीड चमचा तिखट एक चमचा गोडा मसाला
  • चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग

मिक्स डाळवड्याची भाजी कृती

स्टेप १
प्रथम थोडं तेल टाकून वडे भाजून घ्यावे ते काढून ठेवावे त्यामध्येच थोडं तेल टाकून हिंग मोहरी जिरं कढीपत्ता यांची खमंग फोडणी करावी त्यामध्ये कांदा टोमॅटो आले लसूण टाकून छान परतावे

स्टेप २
मग त्यामध्ये हळद तिखट गरम मसाला मीठ गूळ टाकून थोडी कोथिंबीर घालावी वडे घालून गरम पाणी टाकावे व झाकण लावून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्याव्या कुकर थंड झाला की झाकण काढावे.

हेही वाचा >> थंडीत गावरान पद्धतीने बनवा चमचमीत झणझणीत सावजी स्पेशल रस्सा/ तर्री; रेसिपी घ्या, बनवून पाहा…

स्टेप ३
व भाजी एकसारखी करून त्यावर उरलेली कोथिंबीर घालून एक उकळी येऊ द्यावी गॅस बंद करावा व गरम भाजी चपाती भाकरी व भाताबरोबर कारली अतिशय टेस्टी व सुंदर अशी भाजी होती

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mix dalvada bhaji recipe in marathi sabji recipe srk