Mix Pitache Vade Recipe In Marathi: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी अेकदा काय बनवावं ते कळत नाही. अनेकदा तेच तेच खाऊन त्यांनाही कंटाळा येतो. आणि रोज नवीन काय बनवायचं हाच प्रश्न पडतो. मुलांना डब्यात हेल्दी ऑप्शन काय द्यावे हेदेखील अनेकदा कळत नाही. म्हणून तुम्ही घरच्या घरी एक रेसिपी ट्राय करू शकता, जी झटपटही होते आणि हेल्दीदेखील आहे. चला तर मग, जाणून घेऊ या ‘मिक्स पिठाचे वडे’ घरच्या घरी कसे बनवायचे…

साहित्य

  • प्रत्येकी एक वाटी गहू ज्वारी बाजरी नाचणी पीठ अर्धा वाटी तांदळाचे पीठ
  • 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
  • 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
  • 1 चमचा जीरे
  • 1/4 चमचा हळद दीड चमचा तिखट
  • हिरवी मिरची बारीक कापलेली
  • 1 टेबलस्पून तीळ, एक टीस्पून ओवा
  • चवीनुसार मीठ चिमूटभर साखर
  • तळण्यासाठी तेल

कृती

सगळे पीठ एकत्र करून त्यामध्ये चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, जीरे, हळद, तिखट, मीठ, साखर, एक चमचा तेल, ओवा, तीळ व पाणी सगळं घालून छान मळावं.

त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याचे वडे तयार करून घ्यावेत.

गरम तेल करून हे वडे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

अतिशय खुसखुशीत खमंग टेस्टी पौष्टिक वडे तयार होतात, ते सॉस आणि चटणी बरोबर खावेत.

नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader