जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खान्देशी चवीची झणझणीत मिक्स उसळ रेसिपी”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने करा झणझणीत मिक्स उसळ ..
खान्देशी चवीची झणझणीत मिक्स उसळ साहित्य
- २५० ग्रॅम मिक्स उसळ त्यात चवळी, मटकी, मुग, हरबरा, मसुर, वाटाणे
- ४ टेबलस्पुन किसलेल खोबर
- १ उभा चिरलेला कांदा
- २ तमालपत्र
- १० ते १२ कढीपत्ता पान
- ५ ते ६ लसुण पाकळ्या
- १ इंच आल
- २ टेबलस्पुन गरम मसाला
- १ टेबलस्पुन लाल तिखट
- १ टीस्पून हळद, हिंग, जीरे,
- मीठ चवीनुसार
- ३ टेबलस्पुन तेल
- २ टेबलस्पुन भिजवलेले शेंगदाणे
खान्देशी चवीची झणझणीत मिक्स उसळ रेसिपी
स्टेप १
सर्वात प्रथम ५ ते ६ तास मिक्स कडधान्य पाण्यात भिजवून घ्या. छान उमळले की स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जीरे हिंग हळदीची फोडणी करून त्यात उमळलेली उसळ घाला, छान शिजवुन घ्या कुकर मधे १ शिट्टी काढुन घेऊ शकता.
स्टेप २
आता रस्सा उसळसाठी मसाला तयार करून घ्या. खोबर, कांदा,लसुण,आलं, छान तव्यावर खमंग भाजून घ्या व पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
स्टेप ३
आता कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, कढीपत्ता छान परतुन घ्या व मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेला मसाला घाला आणि छान परतून घ्या.
स्टेप ४
वाटलेला मसाला छान फ्राय झाला की त्यात लाल तिखट, काळा मसाला /गरम मसाला घालुन तेल सुटेपर्यंत परतुन घ्या.मसाला छान शिजला की त्यात भिजवलेले शेंगदाणे शिजवलेली उसळ घाला आणि छान एकजीव करून घ्या.
स्टेप ५
आता तुमच्या आवडीनुसार पाणी घाला आणि रस्सा तयार करून घ्या चवीनुसार मीठ घाला आणि मस्त एक २ ते ३ मिनिटे छान उकळी काढून घ्या.
हेही वाचा >> थंडीच्या दिवसांत आवर्जून खायला हवी बारीक मेथीची भाजी; ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचा अन् नक्की करा
स्टेप ६
तयार आहे मस्त खानदेशी झणझणीत गरमागरम मिक्स कडधान्याची रस्सा उसळ