Momos recipe in marathi: मोमोज हा आजकाल लहान ते मोठे सगळ्यांनाच आजकाल आवडतात. व्हेज किंवा नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात हे मोमोज येतात. आता तर याचे अजून वेगवेगळे प्रकारही तयार केले जात आहेत. शहरात विविध ठिकाणी तुम्हाला मोमोज विकणारे स्टॉल, गाड्या आणि दुकाने दिसतील. तुम्हालाही व्हेज मोमोज खायचे असतील आणि बाहेरचे खायचे नसतील तर काही हरकत नाही. तुम्ही घरीही मोमोज बनवायला सहज शिकू शकता.चला तर मग आज पाहूयात सोया मोमोज बनवण्यासाठी सोपी रेसिपी

सोया मोमोज बनवण्यासाठी साहित्य

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

कप रवा

१ कप कॉर्नफ्लोर

१ कप साबुदाणा

२ टेबलस्पून उकडलेल्या बीटरूटचा रस

२ कप सोयाबीन

व्हाईट व्हिनेगर

१ कांदा बारीक चिरलेला

२ बारीक चिरलेले टोमॅटो

एक चतुर्थांश कप बारीक चिरलेले गाजर

एक चतुर्थांश कप बारीक चिरलेले बीन्स

२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

१ इंच आले बारीक चिरलेले

एक चमचा बारीक चिरलेला लसूण

१० पाण्यात भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या

एक चमचा सोया सॉस

अर्धा चमचा लाल तिखट

अर्धा चमचा काळी मिरी पावडर

एक चमचा साखर

वीनुसार मीठ

सोया मोमोज बनवण्याची पद्धत

१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक कप साबुदाणा टाकून भाजून घ्यावा. जेणेकरून साबुदाण्यातील ओलावा पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर मिक्सरमध्ये भाजलेले साबुदाणे घालून पावडर तयार करा. ही पावडर चाळणीने गाळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवावी.

२. आता त्याच भांड्यात पाव कप रवा, कॉर्नफ्लोर आणि अर्धा चमचा मीठ घालून पीठ गरम पाण्याने मळून घ्यावे. तुम्हाला हवं असेल तर मोमोजला रंग देण्यासाठी पीठात २ चमचे उकडलेल्या बीटरूटचा रस ही घालू शकता.

३. पीठ ग्रीस करण्यासाठी एक चमचा तेल घाला. आता एका कढईत दोन कप पाणी घेऊन त्यात एक चमचा बारीक चिरलेला लसूण, एक चमचा बारीक चिरलेले आले, अर्धा चमचा साखर, एक चमचा व्हाईट व्हिनेगर, एक चमचा सोया सॉस आणि दोन कप सोयाबीन घालून सर्व काही उकळेपर्यंत शिजवावे.

४. सोयाबीन उकळताना हे लक्षात ठेवा की ते उकळल्यानंतर पाण्याने धुवावे लागणार नाहीत, अन्यथा त्यात घातलेल्या मसाल्यांची चव निघून जाईल. उकडलेले सोयाबीन ग्राइंडरमध्ये टाकून बारीक करून घ्या.

५. आता एका कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात एक चमचा बारीक चिरलेला लसूण हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्यावा. यानंतर कढईत लसूण सोबत पाव कप बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.

६. आता कढईत एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप बारीक चिरलेले गाजर, सोयाबीन, एक चमचा मीठ, एक चमचा काळी मिरी पावडर आणि बारीक केलेले सोयाबीन घालून चांगले परतून घ्यावे. जेणेकरून सोयाबीनचे सर्व पाणी कोरडे होईल.

हेही वाचा >> अप्रतिम चवीबरोबरच पौष्टीक अशी जवसाची चटणी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

७. आता मोमोज तयार करण्यासाठी आधी तयार केलेल्या पीठाचे लहान गोळे घ्या आणि कॉर्न फ्लोरमध्ये गुंडाळा. आता हा लाटून घ्या. या पुरीमध्ये मोमोजचे स्टफिंग मधोमध ठेवून फोल्ड करून मोमोजचा आकार द्या. हे मोमोज स्टीम करून घ्या. तुमचे चविष्ट सोया मोमोज तयार आहेत.

Story img Loader