Monsoon Special Recipe: पावसाळा सुरु झाला की, काहीतरी चमचमीत, गरमागरम खाण्याची खूप इच्छा होते. चहा बरोबर भजी, पकोडे, वडा, सामोसा किंवा भाजीपाव खाण्याची तर कधी कधी गरमागरम सूप पिण्याची सुद्धा इच्छा होते. पावसाळ्यात सर्वत्र चिखल, तर अनेक ठिकाणी पाणी भरलेलं असते. त्यामुळे घराबाहेर पडून स्टॉल किंवा दुकानातून काही तरी विकत आणण्याची कोणाचीही इच्छा नसते. पण, जर अशावेळी मोजकं साहित्य घरात उपलब्ध असेल. त्यापासून एखादा पदार्थ बनवता आला तर ? चहा -ब्रेड, ब्रेड-बटर असं खाण्यापेक्षा कांदा आणि ब्रेडपासून तुम्ही एक कुरकुरीत पदार्थ बनवू शकता. तुम्ही पावसाळ्यात विविध पदार्थ खाल्ले असतील. तर आज आपण ‘कांद्याचा उपयोग करून एक अनोखा ब्रेड रोल’ (Onion Bread Roll ) बनवणार आहोत. चला तर पाहू हा पदार्थ कसा बनवायचा ते.

साहित्य –

.ब्रेड
२.हिरवी चटणी
३.गोलाकार चिरलेला कांदा
४.बेसन
५.तांदळाचे पीठ
६.हिरवी मिरची
७.हळद
८.मसाला
९.कोथिंबीर
१०.चीज
११.मीठ
१२. तेल

हेही वाचा…VIDEO: खूप भूक लागली आहे? सोयाबीनपासून बनवा ‘असा’ मसालेदार, चटकदार पदार्थ; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या

कृती –

१. सर्वप्रथम ब्रेड घ्या.
२. ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसला लाटणीने लाटून घ्या.
३. त्यावर हिरवी चटणी आणि चीज लावून. त्यांना नंतर रोल करून एका प्लेटमध्ये ठेवून द्या.
४. एका बाउलमध्ये गोलाकार चिरलेला कांदा घ्या.
५. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, हळद, मसाला, कोथिंबीर, मीठ घाला.
६. त्यानंतर वरून पाणी घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
७. रोल करून घेतलेले ब्रेडचे स्लाईज या मिश्रणात बुडवून घ्या.
८. नंतर गॅस चालू करा.
९. त्यावर एक कढई ठेवा आणि त्यात तेल घाला.
१०.नंतर मिश्रणात बुडवून घेतलेले कांद्याचे ब्रेडरोल तेलात खरपूस तळून घ्या.
११.अशाप्रकारे तुमचे कांद्याचे ब्रेड रोल तयार.

कांद्याचा उपयोग करून एक अनोखा ब्रेड रोल बनवण्याची ही रेसिपी @agarnishbowl या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे. या युजरचे नाव गिरीश असे आहे ; ज्यांनी पावसाळा स्पेशल ही खास रेसिपी शेअर केली आहे. तुम्हीसुद्धा पावसाळ्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी जर ब्रेड उपलब्ध असेल तर त्यापासून हा चमचमीत पदार्थ सहज बनवू शकता आणि लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला देऊ शकता आणि पावसाळ्याचा मनोसोक्त आनंद घेऊ शकता.