Moong Dal Snacks : अनेकदा लहान अचानक मुलांना भूक लागते. अशावेळी त्यांना जेवणाशिवाय काय वेगळं खायला देऊ, हे कळत नाही. अशावेळी मूग डाळीचा स्नॅक तुम्ही त्यांना देऊ शकता. मूग डाळीचे नमकीन खायला अत्यंत चविष्ठ वाटतात. मूग डाळ आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे. यात पौष्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्हाला जेव्हा ट्रिपला जायचे असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही मूग डाळ नमकीन बरोबर घेऊन जाऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा आपण मूग डाळ नमकीन विकत आणतो. कारण बऱ्याच लोकांना मूग डाळ नमकीन घरी बनवता येत नाही. पण मूग डाळ नमकीन घरी बनवायला खूप सोपी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मूग डाळ नमकीन नेमकी कशी बनवायचे, त्यासाठी ही सोपी रेसिपी आहे. तुम्ही दोन आठवड्यातून एकदा मूग डाळ नमकीन बनवू शकता आणि दोन आठवडे वापरू शकता. त्यासाठी ही रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य

  • मूग डाळ
  • तेल
  • मीठ
  • लाल तिखट
  • चाट मसाला

हेही वाचा : Soya Sticks आवडतात? मग घरच्या घरी असे बनवा कुरकुरीत सोया स्टिक

कृती

  • एका भांड्यात मूग डाळ घ्या
  • स्वच्छ पाण्याने धूवून घ्या
  • त्यानंतर एक दोन तासासाठी ही डाळ भिजवून घ्या.
  • दोन तासानंतर त्यातील पाणी काढू घ्या.
  • त्यानंतर एका कापडावर ही डाळ पसरून घ्या आणि दोन तासासाठी वाळवून घ्या.
  • गॅसवर कढईत तेल गरम करा आणि गरम तेलात ही डाळ तळून घ्या.
  • कुरकुरीत तळून घ्या.
  • त्यात मीठ टाका.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट आणि चाट मसाला टाका.
  • चांगले एकत्र करा.
  • मूग डाळ स्नॅक तयार होईल.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moong dal snacks recipe how to make moong daal snacks like haldiram at home ndj