Moong Dal Thalipeeth : मुलांना टिफीनवर नेहमी नेहमी काय द्यायचं, हा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या टिफीनमध्ये एखादा पौष्टिक पदार्थ द्यायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आज आपण मोड आलेल्या मूग डाळीचे थालीपीठ कसे बनवायचे, हे जाणून घेणार आहोत. लहान मुलांना टिफीनवर हा पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ एक चांगला पर्याय आहे. हे थालीपीठ कसे बनवायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खाली दिलेला व्हिडीओ नक्की पाहा. या व्हिडीओमध्ये थालीपीठ कसे बनवायचे, याची कृती सांगितली आहेत. (moong dal thalipeeth best healthy and tasty recipe for childrens tifin)
या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
साहित्य
- मोड आलेली मूग
- मिरची
- लसूण
- कांदे
- कोथिंबीर
- धनेपूड
- जिरेपूड
- ओवा
- हळद
- मीठ
- गव्हाचे पीठ
- तांदळाचे पीठ
- ज्वारीचे पीठ
- बेसन
- तूप किंवा लोणी
- तेल
हेही वाचा : VIDEO: खूप भूक लागली आहे? सोयाबीनपासून बनवा ‘असा’ मसालेदार, चटकदार पदार्थ; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या
कृती
- मोड आलेली मूग घ्यायचा आणि लसूण मिरची त्यात टाकायची
- त्यानंतर मिक्सरमधून या मिश्रणाची बारीक पेस्ट करायची.
- त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
- त्यानंतर त्यात मीठ, धनेपूड, जिरेपूड, ओवा, हळद आणि तीळ घालायची.
- त्यानंतर यामध्ये प्रमाणानुसार गहू, तांदूळ, ज्वारी आणि बेसनाचे पीठ घालायचे.
- त्यानंतर हे मिश्रण घट्ट असे भिजवून घ्यायचे.
- पोरपाट घ्यायचा आणि त्यावर सुती ओला रुमाल टाकायचा.
- त्यावर थालीपीठ चांगले थापून घ्यायचे.
- त्यावरून तीळ टाकायचे आणि तव्याला तूप, लोणी किंवा तेल लावून रुमाल त्याच्यावर उलट टाकायचा.
- रुमालवर हात थापायचा म्हणजे रुमालवरून थालीपीठ छान निघते.
- त्यानंतर तूप किंवा लोणी घालून थालीपीठ दोन्ही बाजून खरपूस भाजून घ्यायचं.
- मुले मोड आलेली कडधान्ये खात नाही पण हे हेल्दी आणि टेस्टी थालीपीठ मात्र नक्की आवडीने खाणार.
- या थालीपीठाबरोबर तुम्ही दही खाऊ शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ
mood_and_food_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शाळेचा Tiffin भाग – १ हेल्दी आणि टेस्टी थालीपीठ बनवून बघा जादू, मुले मागून मागून खातील..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यालाच आमच्याकडे धपाटे म्हणतात” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान वाटले थालीपीठ” आणखी एका युजरने लिहिलेय, ” रेसिपी खूप छान आहे”