सँडविच हे अतिशय चविष्ट पदार्थ आहे, जे जवळजवळ प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने खातो. सँडविच अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. सँडविच तसं तर ते अनेक प्रकारे बनवलं जातं, जे जगभर प्रसिद्ध आहेत. हे बनविणे सोपे तर आहेच पण पटकन तयार ही केले जाते आणि म्हणूनच आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांच्या नाश्त्यात सँडविचने आपले स्थान निर्माण केले आहे. आज आपण पौष्टिक अशा मूग सँडविचची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

मूग सँडविच साहित्य

एक कप हिरवी मूग डाळ (साल असलेली)
ब्रेड
दोन चमचे बेसन
चवीनुसार मीठ
जिरे
हिंग
हळद
पिझ्झा सिजनिंग
मेयोनीज
चीज
टोमॅटो सॉस
देशी तूप

मूग सँडविच बनवण्याची पद्धत

हे सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मूग डाळ धुवून पाण्याशिवाय नीट बारीक करून घ्यावी.

आता या बारीक केलेल्या मूग डाळीत मीठ, एक ते दीड चमचे बेसन घालावे. सोबत जिरे, हिंग घाला. थोडे थोडे पाणी घाला आणि घट्ट पीठ तयार करा.

आता नॉनस्टिक पॅन गॅसवर गरम करून त्याला थोडे तूप लावा आणि तयार केलेली मूगाची पेस्ट पॅनकेकप्रमाणे त्यावर पसरवा.

हे नीट पसरवल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने बाजूने दाबून ठेवावे जेणेकरून तो चौकोनी आकार घेईल आणि ब्रेडसोबत ठेवायला चांगला दिसेल. दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्या.

हेही वाचा >> मस्त गरमागरम हेल्दी सूप; चवीला सुपरटेस्टी, घशालाही मिळेल आराम

आता ब्रेड सुद्धा तव्यावर भाजून घ्या. आता ब्रेडवर टोमॅटो सॉस लावा. सोबतच चीज किसून टाका आणि वर पिझ्झा सिजनिंग शिंपडा.