काचेच्या बरणीत भरलेला पिवळट, चॉकलेटी मुरंबा पाहिला की पटकन तोंडात टाकावासा वाटतो.. आवळा हा मुळातच पौष्टिक आणि पाचक असतो. त्यात जेव्हा आपण त्याचा मुरंबा किंवा माेरावळा बनवतो, तेव्हा त्याची पौष्टिकता खूप जास्त वाढते. एकदा मोरावळा बनवला की तो वर्षभर चांगला टिकतो. रोज एक चमचा मोरावळा म्हणजे घरच्या घरी तयार केलेले टॉनिक. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी

मोरावळा साहित्य

Nashik, Kumbh Mela , meeting ,
नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
soybean , soybean registration, soybean guaranteed rate,
सोयाबीन नोंदणीस मुदतवाढ, तरीही दर हमीभावापेक्षा कमी
Chandrapur air pollution annual statistics year 2024
चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…
Work on direct water pipeline from Gangapur Dam begins
गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार

१/२ किलो आवळे
१/२ किलो गूळ
चीमुठभर मीठ
चार-पाच लवंगा
१ ते २ दालचिनीचे तुकडे

मोरावळा कृती

स्टेप १

सर्वप्रथम आवळे धूवून ते मिठाच्या पाण्यात चार ते पाच तास भिजवून घ्या. त्यानंतर एका स्वच्छ टॉवेलवर टाकून स्वच्छ पुसून घ्यावेत. मग त्याला काटे चमचाच्या साह्याने सगळ्या साईडने बी पर्यंत टोचून घ्यावं.

स्टेप २

जाड बुडाच्या कढईमध्ये गूळ, एक छोटा चमचा पाणी, मीठ, लवंग दालचिनी घालून गुळ विरघळेपर्यंत गॅसवर ठेवून हलवत राहावे. मग त्यामध्ये आवळे घालून मंद गॅसवर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं आवळे शिजू द्यावं.

हेही वाचा >> थंडी स्पेशल ओली हरभऱ्याची भाजी; “या” खास पद्धतीने बनवा मुलंही आवडीने खातील

स्टेप ३

अवळ्यामुळे पाणी सुटल्यामुळे आपलं मिश्रण पातळ होतं. ते घट्ट होईपर्यंत मंद गॅसवर ठेवा त्यानंतर छान घट्ट झालं की गॅस बंद करा. मिश्रण थंड करून बंद काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवावे. हा बहुगुणी आवळा वर्षभर राहतो आणि अतिशय गुणकारीही आहे.

Story img Loader