नेहमीच्या चिकनच्या रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हटके चिकनची रेसीपी ट्राय करू शकता. ही एक सोपी पण स्वादिष्ट चिकन रेसिपी आहे, जी जास्त मेहनत न करता काही मिनिटांत बनवता येते. ही एक हेल्दी रेसीपी आहे. ही सोपी चिकन डिश आहे मोरोक्कन लेमन चिकन. कसं बनवायचं मोरोक्कन लेमन चिकन हे जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोरोक्कन लेमन चिकन साहित्य

  • १ किलो चिकन (त्याचे बरोब्बर ६ तुकडे करून घ्या. लेगचे दोन आणि ब्रेस्टचे २)
  • ४ मोठे चमचे तेल (ऑलिव्ह ऑइल असल्यास उत्तम)
  • २ कांदे, कोथिंबीर, थोडीशी पार्सली
  • ५-६ लिंबे, ५-६ लसूण पाकळ्या
  • अडीच इंच आले, १ चमचा काळीमिरी 
  • १ चमचा हळद, मीठ चवीपुरते, अर्धा ग्रॅम केशर

मोरोक्कन लेमन चिकन कृती

  • कांदे उभे चिरून घ्या. कोथिंबीर, पार्सली चिरून घ्या. लसूण बारीक चिरा. आले किसून घ्या. काळीमिरीही थोडीशी चेचून घ्या.
  • आता चिकन सोडून बाकीच्या या सगळ्या गोष्टी एकत्र करा. हे मिश्रण चिकनला लावा. हे माखलेले चिकन २-३ तास ठेवून द्या.
  • एका पसरट भांडय़ात हे माखलेले चिकन ठेवून अगदी मंद आचेवर ते साधारण तासभर शिजवावे. चिकन शिजल्यावर त्याला छान रस सुटतो. तो पौष्टिक असतो.

हेही वाचा – दलिया खिचडी: ‘हॉटेल स्टाईल खिचडी’ नक्की ट्राय करा; ही घ्या चविष्ट, चवदार रेसेपी

  • आता हे शिजलेले चिकन एका ताटलीत काढून घ्या. सूपसोबत किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत वाढा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moroccon chicken roll recipe in marathi chicken and chickpea tagine recipe srk