दिवाळी आता दोन दिवसांवर आली आहे. घरोघरी महिलांची फराळाची घाई सुरु आहे. एक एक पदार्थ महिला बनवत आहेत. यातच दिवाळीत घरोघरी पाहायला मिळणारी मिठाई म्हणजे मोतीचूरचे लाडू. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लाडू आवडतात. मात्र बरेचजण मिठाई बाहेरुन आणतात. घरी कुणी करत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ही रेसिपी कशी करायची हे सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात घरच्या घरी सोप्या पद्धतीत मोतीचूरचे लाडू कसे करायचे. त्यामुळे आता दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखे परफेक्ट मोतीचूर लाडू रेसिपी…

मोतीचूर लाडू साहित्य

Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
  • १ किलो बेसनची बुंदी
  • १ किलो साखर
  • तेल
  • दीड टेबलस्पून वेलची पावडर
  • १/२वाटी काजूचे तुकडे
  • १/२ वाटी मगज बी
  • मीठ चवीपुरते

मोतीचूर लाडू कृती

स्टेप १
सर्वप्रथम बुंदी बनवून घेण्याकरता बेसन पीठ बारीक दळून आणावे आणि ते सरसरीत भिजवून घ्यावे. त्यानंतर चिमूटभर मीठ त्यात घालावे आणि बुंदी मोतीचूरची असल्यामुळे बारीक झार्याने पाडून घ्यावी.

स्टेप २
आता बुंदी पाकात घालण्याकरता पाक तयार करण्याकरिता एक किलो साखर घ्यावी आणि साखर बुडेल एवढे पाणी घालावे मध्यम आचेवर उकळू द्यावे.

स्टेप ३
पाक साखर विरघळेपर्यंत सतत हलवावा साखरेचा पाक एकतारी असावा तोपर्यंत साखर सतत हलवत राहावे. एकतारी पाक तयार झाला की गॅस बंद करावा आणि त्यात वेलची पावडर घालून घ्यावी. सोबत केशर वेलची सिरपही घालावे असल्यास

स्टेप ४
पाक थोडा थंड झाला की त्यात तयार बुंदी घालावी आणि छान हलवून घ्यावी. वर खाली करून बुंदी हलवलेली असल्यास बुंदी छान मुरते त्यानंतर बुंदी झाकून किमान अर्धा तास तरी ठेवावे. मधून मधून हलवून पाहावे नंतर लाडू वळण्यास घ्यावे.

हेही वाचा >> दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखी परफेक्ट काजू कतली; नोट करा सोपी रेसिपी

स्टेप ५
लाडू वळताना त्याला मगज बी आणि काजू लावून लाडू बांधावेत लाडू बांधताना थोडा पाक बाजूला काढून ठेवावा. जेणेकरून पाक जास्त होऊ नये किंवा जरी पाक कमी पडला तरी तो नंतर वरून घालता येतो. जास्त पाक झाल्यास लाडू वळता येत नाही.