शुभा प्रभू-साटम
साहित्य
मोडाचे मूग १ वाटी, ओलं खोबरं अर्धी वाटी, सुक्या मिरच्या चवीनुसार, धणे १ छोटा चमचा, मिरी २-४ दाणे, चिंचेचा कोळ थोडासा, हळद, मीठ, गूळ, तेल, काजू आवडीनुसार.
कृती
मूग आणि काजू थोडे बोटचेपे शिजवून घ्या. शिजताना त्यात हळद घाला. हवी तर हिरवी मिरची. कुकरची १ शिटी पुरे. कढईत सुक्या मिरच्या किंचित लाल करून घ्या. (सुक्या भाज्या) यात मिरच्या, थोडी हळद, चिंच कोळ, धणे, मिरी, ओलं खोबरं, सर्व गंधाप्रमाणे वाटा. शिजलेल्या मुगात हे वाटप घालून हवे तसे पातळ करून घ्या. चवीप्रमाणे गूळ आणि मीठ घाला. उकळून घ्या. पळीत तेल / तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा आणि मुगात ओतून लगेच झाकण ठेवा. कढईतही फोडणी करू शकता. काजू नको असल्यास खोबऱ्याचे काप घालू शकता. चिंच नको असल्यास उकळी काढताना कोकम घाला.
टीप
पारंपरिक पद्धतीत मुगाला मोड आणून त्याची साले काढतात. ते वैयक्तिक आवडीनुसार ठरवावे.