Murmura Chivda Recipe : चिवडा हा असा पदार्थ आहे जो आपल्यापैकी अनेकांना आवडतो. कधी भूक लागली तर लगेच आपल्याला चिवडा आठवते. तुम्ही कधी कुरकुरीत मुरमुऱ्यांचा चिवडा खाल्ला आहे का? मुरमुऱ्यांचा चिवडा बनवायला अगदी सोपी आणि तितकाच चविष्ठ असतो. लहान मुलांना चिवडा हा खूप आवडतो. अनेकदा लहान मुलांना कधीही भूक लागते अशावेळी त्यांच्यासाठी काय बनवावे, हा प्रश्न पडतो तेव्हा हा झटपट होणारा चिवडा एक चांगला पर्याय ठरतो. पिकनिकला जायचे असेल किंवा कुठे फिरायला तुम्ही हा चिवडा खायला घेऊन जाऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा चिवडा कसा बनवायचा? तर टेन्शन घेऊ नका, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुरकुरीत मुरमुऱ्यांचा चिवडा रेसिपी सांगितली आहे.
व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
साहित्य
- मुरमुरे
- शेव
- लसूण
- तेल
- डाळ
- हिरवी मिरची
- शेंगदाणे
- कढीपत्ता
- तिखट
- हळद
- मीठ
- हिंग
- कांदा
कृती
- सुरुवातीला मुरमुरे घ्या.
- त्यानंतर त्यात शेव टाका.
- त्यानंतर लसूण वाटून घ्या आणि तेलातून तळून घ्या.
- त्यानंतर शेंगदाणे तेलातून तळून घ्या.
- त्यानंतर डाळ तळून घ्या
- त्यानंतर हिरवी मिरची चिरून घ्या आणि तेलातून तळून घ्या.
- त्यानंतर कढीपत्ता तेलातून तळून घ्या .
- त्यानंतर हे सर्व तळलेले पदार्थ लसूण, शेंगदाणे,डाळ, हिरवी मिरची आणि कढीपत्ता मुरमुऱ्यांवर टाका.
- त्यानंतर तेलातून लाल तिखट, हळद, मीठ आणि हिंग हे सर्व मसाले तळून घ्या. आणि त्यानंतर हे तेल मुरमुऱ्यांवर टाका.
- सर्व मिश्रण एकत्र करा. तुमचा मुरमुऱ्यांचा चिवडा तयार होईल.
- सर्व्ह करताना चिवड्यावर बारीक चिरलेला कांदा आणि शेव टाका.
पाहा व्हायरल व्हिडीओ
annapurna_amruta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “झटपट आणि चटपट मुरमुऱ्यांचा चिवडा…..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा फक्त आणि फक्त आमच्या आष्टा मोडला भेटतो,लातूरकर लाईक करा” तर एका युजरने लिहिलेय, “याला कोल्हापुरी भडंग म्हणतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटले” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. अप्रतिम अशी रेसिपी म्हणत युजर्सनी कमेंट्चा वर्षाव केला आहे.