काहींना मशरुम खूप आवडतं तर काहींना अजिबात आवडत नाही. घरात अजिबात मशरुम न खाणारे हॉटेलमध्ये गेल्यावर मात्र वेगवेगळ्या पदार्थांतील मशरुम अगदी आवडीने खातात. मशरुममध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी दूर होऊन तब्येत चांगली राहण्यास मदत होते. भाजीपेक्षा काहीसं वेगळं असलं तरी मशरुम चवीला चांगले लागते. पिझ्झा, पास्ता, सूप, भाजी यांसारख्या पदार्थांमध्ये मशरुमचा आवर्जून वापर केला जातो. मशरूम पौष्टीक भाजी असून शाकाहारी लोकांची आवडती भाजी. चला तर मशरूम मसाला कसा बनवायचचा ते बघुया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मशरूम मसाला करी साहित्य

  • १०० ग्रॅम मशरूम
  • २ कांदे बारीक चिरलेले
  • २ मिरच्या
  • ५-६ कडिपत्त्याची पाने
  • १-२ टिस्पुन आलेलसुण पेस्ट
  • १/४ टिस्पुन हळद
  • १-२ टिस्पुन तिखट
  • १-२ टिस्पुन किचनकिंग मसाला
  • २ टेबलस्पुन टोमॅटो प्युरी
  • १ टिस्पुन जीरे
  • १ टेबलस्पुन कसुरी मेथी
  • १-२ टिस्पुन धने पावडर
  • चविनुसार मीठ
  • १-२ टेबलस्पुन तेल

मशरूम मसाला करी कृती

स्टेप १
मशरूम मसाला ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा. मशरूम व कांदे चिरून ठेवा

स्टेप २
पसरट कढईत तेल गरम झाल्यावर जीरे व उभ्या चिरलेल्या मिरच्या परता नंतर त्यात कडीपत्ता, चिरलेले कांदे, परतुन घ्या नंतर त्यात आलेलसूण पेस्ट मिक्स करून परता थोडी चिरलेली कोथिंबिर मिक्स करत शिजवा

स्टेप ३
नंतर त्यात हळद, धने पावडर, तिखट, किचनकिंग मसाला, कसुरी मेथी मिक्स करून चांगले परतुन घ्या नंतर त्यात टोमॅटोप्युरी व थोडे मीठ मिक्स करून२ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा त्यातच नंतर चिरलेले मशरूम मिक्स करा

स्टेप ४
आवश्यकते नुसार गरमपाणी व चविनुसार मीठ मिक्स करून५ -७ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा आपली मशरूम मसाला ग्रेव्ही रेडी

हेही वाचा >> पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव

स्टेप ५
गरमागरम मशरूम मसाला ग्रेव्ही प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत पोळ्या किंवा वाफाळता भात, रोटी, भाकरी देता येईल

मशरुममध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटसमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून आपली सुटका होते.

मशरुममध्ये कार्बोहायड्रेटसचं तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असतं त्यामुळे ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी मशरुम खाण्याचा फायदा होतो.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mushroom masala gravy recipe in marathi how to make mushroom masala at home srk
Show comments