दीपा पाटील
साहित्य
१ किलो मटण चॉप्स, २ चमचे आले-लसूण पेस्ट, २ चमचे मिरची-कोथिंबीर पेस्ट, २ चमचे गरम मसाला, १ चमचा हळद, २ अंडी, अर्धा कप ब्रेडचा चुरा, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती
मटण चॉप्सला हळद-मीठ लावून थोडासा पाण्याचा हबकारा मारून कुकरमध्ये शिजवून घ्या. चांगल्या ३ शिट्टय़ा होऊ द्या. आता आले-लसूण, मिरची कोथिंबीर, गरम मसाला एकत्र करून हे मिश्रण शिजलेल्या मटण चॉप्सना लावून घ्या आणि ते अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. आता एका भांडय़ात अंडी फेटून घ्या. एका भांडय़ात ब्रेडचा चुरा ठेवा. तळण्यासाठी तेल गरम करा. मसाला माखलेले मटण चॉप्स अंडय़ात बुडवून आणि ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून घ्या. मस्तपैकी तळून घ्या.