आपल्या रोजच्या जेवणात भात, पोळी, भाजी, आमटी, कोशिंबीर यांचा समावेश असतो. तृणधान्य हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे. बाजरी, राजगिरा, बार्ली, नाचणी यांचा त्यात समावेश होतो. नाचणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तांदूळ आणि गहू आणि ज्वारी पेक्षा किती तरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात.या नाचणीची तुम्ही आतापर्यंत भाकरी खाल्ली असेल किंवा लहान मुलांसाछी नाचणी सत्व बनवलं असेल पण आज आम्ही तुमच्यासाठी नाचणीची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. चल तर मग जाणून घेऊया नाचणीपासून बर्फी कशी तयार करायची.
नाचणी बर्फी साहित्य –
- नाचणीचे पीठ १ वाटी,
- गूळ १ वाटी, दूध अर्धी वाटी
- वेलची, तूप (मापाला एकच वाटी वापरा)
नाचणी बर्फी कृती –
नाचणीचे पीठ पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या आणि जाड बुडाच्या भांड्यात थोडे दाट हाईपर्यंत शिजवा. फार शिजवू अथवा घट्ट करू नये. त्यात गूळ घाला आणि शिजवा. पाचेक मिनिटांनी दूध घाला. वेलची घालून मिश्रण घट्ट होईतो मंद आगीवर सतत ढवळत शिजवा. तोपर्यंत थाळ्याला तूप लावून तयार करा आणि हे शिजलेले मिश्रण त्यात ओता. ठोकून सारखे करावे. गार झाल्यावर वड्या पाडा. पीठ हे श्रीखंडापेक्षा जरा घट्ट व्हायला हवे. यात आवडीप्रमाणे काजू घालू शकता.
हेही वाचा – ताडगोळ्याचे वडे, वाढलेलं वजन होईल कमी! नक्की ट्राय करा ही रेसिपी
सध्या वजनवाढीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी नाचणीचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.