महाराष्ट्र हा त्याच्या आगळ्या वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. यात महाराष्ट्राची खाद्य संस्कृती हा नेहमीच चर्चेचा विषय राहलाय. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे आणि हेच खाद्यपदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख आहे.आज आपण महाराष्ट्रातील एका अशा हटके झणझणीत नागपूरी सावजी मटणची रेसिपी पाहणार आहोत. सावजी मटण म्हटलं की नाव समोर येतं ते नागपूरचं. अर्थातच सावजी मटण हे नागपूरकरांची ओळख आहे. सावजी मटण हे त्याच्या झणझणीत टेस्टमुळे ओळखलं जातं. या मटणाला काळी तर्री असते आणि हे खायला खूप स्वादिष्ट आणि तिखट असतं.

सावजी मटण साहित्य

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
  • २ किलो मटण
  • ५ मोठे कांदे
  • २ चम्मच खाकस
  • ५ दालचिनी चे तुकडे,
  • ७ मोठी विलायची,
  • १०-१२ मिरे,
  • ५ छोटी विलायची
  • ४ तूकडे जायपत्रि,
  • ७-८ लाल सूखी मिरची
  • ४ चम्मच धने,
  • १ चमच जीरे व
  • १ चमच राई
  • १ वाटी लाल तिखट,
  • १ चमच हळद,
  • १-१/२ चमच सूरूचि गोडा मसाला
  • मीठ आवश्यकतेनुसार
  • १ वाटी आल लसून पेस्ट
  • मूठभर पालक व गार्निश करायला कोथिंबीर
  • २ वाटी तेल

सावजी मटण कृती

स्टेप १

सर्व प्रथम मटण स्वच्छ धुवून घ्या कुकर मध्ये घालून त्यात थोड पाणी तेल व हळद घालून २ ते ३ शिटी करून घ्या.
सर्व प्रथम कांदा लांब पातळ चिरून घ्यायचा. त्यानंतर तव्यावर टाकून चांगला परतून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर कांद्यावर झाकन टाकून दोन मिनिटे परतून घ्यायचे मग मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे.

स्टेप २
नंतर तव्यावर दालचिनी, मोठी वेलची, छोटी वेलची, जायपत्री आणि मिरे घालून भाजून घ्यायचे आहे. नंतर धने, लाल सूखी मिरची टाकून भाजून घ्यायचे आहे.

स्टेप ३
आता जीरे व राई घालून भाजून घ्यायचे आहे. शेवटी जारमध्ये पालक व मूठभर कोथिंबीर टाकून थोड पाणी टाकून पूर्ण पेस्ट बारीक करून घ्यायचे.

स्टेप ४
मसाला पूर्ण बारीक झाल्यावर पातेल्यात तेल घालून मसाला टाकून छान परतून घ्या. नंतर त्यात आलं लसून पेस्ट घाला व परतून घ्या. कांदा लालसर झाला की मसाला टाकून १०,१५ मिनिटे छान परतून शिजवून घ्यायचे आहे.

स्टेप ५
मसाला पूर्ण शिजल्यावर (मसाल्यातून तेल बाजुला झालं की मसाला शिजला समजायचं आहे)

स्टेप ६
शिजलेल्या मसाल्यात तिखट मीठ आणि हळद घालायचे आणि २ मिनट परतून घ्यायचे.

स्टेप ७
नंतर तिखट वगैरे शिजल्यावर त्यात मटण घालून चांगले फिरवून घ्यायचे. नंतर ताट झाकून २० मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्यायचे.

हेही वाचा >> Spinach Omelette : पालकचे ऑम्लेट कधी खाल्ले का? जाणून घ्या ही हटके रेसिपी

स्टेप ८
मग २५ मिनीटनंतर मटण अर्धे शिजत आल्यावर त्यात ४ ग्लास पाणी टाकून १५ मिनीटं पून्हा झाकून शिजू द्यायचे.

स्टेप ९
१५ मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायची गरमागरम सावजी मटण ग्रेव्ही तयार…सावजी मटण भाकरी,चपाती भातासोबत खाऊ शकता.

Story img Loader