Kadhi Bhel Recipe : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. प्रत्येक जिल्ह्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. पुण्याची बाकरवडी, नागपूरचे तर्री पोहे, मुंबईचा वडापाव इत्यादी. पण तुम्ही कधी नाशिकच्या कढी भेळविषयी ऐकले आहे आहे. आज आपण नाशिकच्या या हटके पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी नाशिकची कढी भेळ खाल्ली का? चवीला अप्रतिम आणि स्वादिष्ट असलेली कढी भेळ नाशकात लोकप्रिय आहे. कढी भेळ ही कढी आणि भेळ एकत्र करून बनवलेला पदार्थ आहे.
नाशिकमध्ये गेल्यावर तुम्ही हा पदार्थ आवडीने खाऊ शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कढी भेळ कशी बनवायची, तर अगदी सोपे आहे. सोशल मीडियावर कढी भेळची रेसिपी सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कढी भेळ कशी बनवायची, हे सांगितले आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. (Kadhi Bhel Recipe News In Marathi)
साहित्य –
- दही
- बेसन
- हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता
- लसूण
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- तेल
- जिरे
- मोहरी
- हळद
- मीठ
- कुरमुरे
- फरसाण
- बारीक चिरलेला कांदा
पाहा व्हायरल व्हिडीओ
कृती :
कढी
- एका भांड्यामध्ये ताजे दही घ्या.
- दह्यामध्ये बेसन टाका आणि एकत्र करा.
- थोडे पाणी घालून चांगले मिक्स करा.
- मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच-सहा मिरच्या, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घ्या आणि मिक्सरमधून चांगले बारीक करा. ही मिरच्याची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्या
- एका कढईमध्ये तेल गरम करा.
- गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, आणि मिक्सरमधून बारीक केलेली मिरच्याची पेस्ट टाका.
- त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाका.
- आणि त्यानंतर त्यात बेसन एकत्र केलेले दही टाका.
- त्यानंतर गरजेनुसार पाणी टाका.
- शेवटी चवीनुसार मीठ टाका
- कढी चांगली उकळू द्या.
- कढीला चांगली उकळ आली की तुमची कढी तयार होईल.
- शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
हेही वाचा : VIDEO: “…तर वंशाचे दिवे हवेतच कशाला” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
भेळ
- एका भांड्यामध्ये कुरमुरे घ्या
- त्यात फरसाण टाका.
- बारीक चिरलेला कांदा टाका
- त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
- त्यावर तयार केलेली कढी घाला.
- कढी भेळ तयार होईल.
ही भेळ कधी तुम्ही नाश्त्याला किंवा अचानक घरी पाहूणे आले तर त्यांच्यासाठी कमी वेळेत झटपट बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भेळ आवडेल.