Navratri 2023: यंदा शारदीय नवरात्रौत्सवास १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या उत्सवाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. काही जण केवळ फलाहार करणं पसंत करतात तर काही वेगवेगळ्या फराळाचा आस्वाद घेतात. नवरात्रीच्या उपवासासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आजची रेसिपी आहे. भगरेचा खास पुलाव, चला तर जाणून घेऊयात याची रेसिपी..
भगर पुलाव साहित्य –
- एक कप भगर
- क्वार्टर कप शेंगदाणे
- दोन बटाटे
- एक चमचा जिरे
- दोन चमचे तूप
- ४ हिरव्या मिरच्या
- एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
- दोन कप पाणी आणि चवीनुसार मीठ.
भगर पुलाव कृती –
- भगरीचा खास पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे धुवून ते कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यानंतर भगर धुवून पाण्यात भिजवा.
- सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर भगरमधील पाणी काढून टाका आणि झाकून ठेवा आणि काही काळ सोडा.
- यानंतर उकडलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करून हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
- आता गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यात तूप घालून गरम करा. तूप गम झाल्यानंतर त्यात आधी शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाण्याला हलका सोनेरी रंग आल्यावर त्यांना एका भांड्यात काढून घ्या.
- पुढे त्यात जिरे घाला आणि तडतडू द्या. यानंतर बटाटे घालून थोडे मीठ टाका आणि बटाटे सुमारे दोन ते तीन मिनिटे तळून घ्या. यानंतर भगर घालून दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा आणि आणखी दोन मिनिटे राहूद्या.
- आता त्यात पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि शेंगदाणे घाला. यानंतर ते उकळू द्या. उकळल्यानंतर गॅस कमी करा आणि पॅन झाकून ठेवा.
हेही वाचा >> बीटाची भाजी; चवदार आणि चटपटीत मोठी माणसंच काय तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील
- सुमारे २० ते २५ मिनिटे शिजू द्या. भगर शिजल्यावर गॅस बंद करा आणि चिरलेली कोथिंबीरवरून टाका. आता गरम गरम सर्व्ह करा.