Navratri 2024 Naivedya : अवघ्या देशभरात ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. यामध्ये नऊ दिवस शक्तीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, देवीच्या प्रत्येक रूपाला तिचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्ही तुमच्या नैवेद्याचा भाग म्हणून वेगवेगळे पदार्थदेखील बनवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दूध शिजवून पेडा बनवू शकता. परंतु आज आपण नैवेद्यासाठी अगदी मोजक्या साहित्यात बदामाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

बदामाचा शिरा बनवण्याचे साहित्य –

२५० ग्रॅम बदाम

१.२५ कप गाईचे तूप

१ कप साखर

बदामाचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी –

सुरुवाीला एक कढई घ्या आणि त्यात तूप टाका.

गरम तूपात रवा चांगला भाजून घ्या.

सुरुवातीला बदामचे साल काढून घ्या आणि हे बदाम मिक्सरमध्ये बारीक करुन जाडसर पूड तयार करा.

कढईत पुन्हा तूप गरम करुन ही बदामची पूड सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

त्यात भाजलेला रवा चांगला नीट ढवळून घ्या.

त्यानंतर त्यात साखर आणि दूध घालून हे मिश्रण नीट एकजीव करा.

त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि शिरा चांगला शिजवून द्या.

त्यानंतर केशर घालून थोडा वेळ आणखी शिरा शिजवा.

शेवटी त्यावर वेलची पूड आणि बारीक केलेले काजू बदाम टाका.

गरमा गरम बदाम शिरा तयार होणार.

हेही वाचा >> पौष्टीक हरियाली पुरी; एकदा खाल तर खातच रहाल अशी सोपी मराठी रेसिपी

शिरा सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर गरमागरम तूप टाकून द्यावे.