सध्या सण आणि उत्सवांचा काळ आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवर सुरु आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेच्या विविध रुपांची पुजा आणि व्रत केले जातात. अनेकजण नवरात्रीचे कडक उपवास करतात. काही जण पायात चप्पल घालत नाही तर काही गादीवर बसत नाही. काही जण निर्जला उपवास करतात तर काही जण फक्त पाणी किंवा फक्त फळांवर उपवास करतात. काही जण फक्त उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. उपवासाचे पदार्थ म्हटलं की साबुदाना खिचडी किंवा वडा आवर्जून बनवला जातो पण नऊ दिवसांचे उपवास असल्यावर रोज एकच पदार्थ खाल्ला जात नाही अशा वेळी तुम्ही उपवासाचे इतर पदार्थ खाऊ शकता. असाच एका उपवासाच्या पदार्थ म्हणजे उपवासाची इडली आणि चटणी. जशी तांदुळाची इडली तयार करता येते तशीच साबुदाणा आणि वरई वापरून उपवासाची इडली तयार करता येते. चला तर मग जाणून घेऊ या… कशी तयार करतात उपवासाची इडली-चटणी

उपवासाची इडली-चटणी रेसिपी

उपवासाची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप वरई
  • १/४ कप साबुदाणा
  • १/२ कप दही
  • चवीनुसार सैंधव मीठ
  • १/२ चमचा इनो सोडा

हेही वाच – Video : रात्री उरलेल्या चपातीचे न्युडल्स! झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी

उपवासाची इडली बनवण्याची कृती

प्रथम वरई आणि साबुदाणा स्वच्छ धूवून चार तास भिजवून घ्या.
चार तासानंतर वरई आणि साबुदाणामध्ये दही घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या
आता एका भांड्यात तयार पीठ काढा. त्यात अर्धा चमचा इनो सोडा आणि चवीनुसार मीठ घाला
इडली शिजवण्यासाठी गॅसवर एक भाड्यांत पाणी उकळण्यासाठी ठेवा.
आता इडली पात्राला तेल लावून त्यात तयार इडलीचे पाठी घाला.
गरम झालेल्या पाण्यात इडली पात्र ठेवा आणि झाकण लावून चांगले वाफवून घ्या.
उपवासाची इडली तयार आहे. चटणीबरोबर खाऊ शकता.

हेही वाचा – कच्चा बटाटा आणि बेसनचा बनवा खमंग कुरकुरीत नाश्ता, तेही फक्त १० मिनिटांत, झटपट लिहून घ्या रेसिपी

उपवासाची चटणी

उपवासाची चटणी बनवण्यासाठी साहित्य

  • भाजलेले शेंगदाणे- १ कप
  • ओलं खोबरं – अर्धा कप
  • हिरवी मिरची – १ कप
  • दही – २ चमचे
  • मीठ – आवश्यकतेनुसार
    पाणी – तूप

हेही वाचा – Sandwich Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा दही सँडविच; एकदम सोपी आहे रेसिपी

उपवासाची चटणी बनवण्याची कृती

एका मिक्सरच्या भाडंयात भाजलेले शेंगदाणे, ओल खोबर, हिरवी मिरची,दही टाकून वाटून घ्या. त्यात मीठ आणि पाणी टाका. उपवासाच्या इडलीबरोबर उपवासाची चटणी खाऊ शकता.

गरमा गरम उपवासाची इडली आणि चटणीवर ताव मारा.