नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण ९ दिवसांचा उपवास करतात. अशावेळी रोज रोज साबुदाणा खिचडी खाणे शक्य होत नाही. त्यामुळे उपवासाचे वेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता. उपवासाच्या पदार्थांपैकी अशाच एका पदार्थ म्हणजे उपवासाची भाकरी.

तुम्हाला जर साबुदाणा खिचडी नको असेल तर तुम्हा साबुदाण्याच्या पिठाची भाकरी खाऊ शकता. यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही. तुम्ही स्वयंपाक घरात असलेले उपवासाचे पदार्थ वापरून ही भाकरी तयार करू शकता. लहान मुलांसह मोठ्यांना ही भाकरी नक्की आवडेल. साबुदाण्याच्या पिठाची भाकरी कशी बनवायची हे जाणून घेऊ या

Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

हेही वाचा – कच्चा बटाटा व गव्हाच्या पिठाचे बनवा खमंग अन् कुरकुरीत नाश्ता, तेही फक्त १० मिनिटांत

साबुदाण्याच्या पिठाची भाकरी

साबुदाण्याच्या पिठाची भाकरीसाठी लागणारे साहित्य

  • साबुदाणा १ वाटी
  • शिजवलले बटाटे २-३
  • मिरची पेस्ट – १ चमचा
  • मीठ
  • तूप

हेही वाचा – Navratri Special : नवरात्र विशेष झटपट बनवा जाळीदार मऊ उपवासाची इडली-चटणी

साबुदाण्याच्या पिठाची भाकरी बनवण्याची कृती

  • प्रथम एका भांडे गॅसवर तापवून त्यात एक वाटी साबुदाणा टाका आणि चांगला भाजून घ्या
  • आता भाजलेला साबुदाणा मिक्सरमध्ये टाकून त्याची पिठी करून घ्या.
  • आता एका चाळणीने साबुदाणा चाळून घ्या.
  • बटाटे शिवजून साल काढून घ्या
  • साबुदाण्याच्या पिठात शिजवलेले बटाटे आणि मिरचीची पेस्ट आणि मीठ टाका आणि चांगले मळून घ्या
  • आता तयार पिठाचा गोळा करून साबुदाण्याची पिठी वापरून थापून किंवा लाटून घ्या
  • आता गरम तव्यावर तयार केलली भाकरी भाजून घ्या भाकरी भाजताना तुम्ही त्याला तूप लावू शकता.

आता गरमा गरम भाकरी उपवासाचा मिरचीचा ठेचा किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता.