Ninav Barfi Recipe In Marathi: उन्हाळा हा सुट्ट्यांचा सीझन असतो. या तीन महिन्यांच्या काळात मुलांना सुट्ट्या असतात. सुट्टी असल्याने ती आजोळी जात असतात. मुलांसह नोकरदार मंडळीही सुट्ट्या घेऊन कुटूंबासह वेळ घालवताना दिसतात. उन्हाळ्यामध्ये लग्नसभारंभाच्या निमित्ताने नातेवाईक घरी येत असतात. घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. अशा वेळी घरातील गृहिणी सर्वांसाठी काहीतरी खास बनवायचा विचार करत असतात. तुमच्या मनात सुद्धा असा विचार येत असेल, तर तुम्ही घरच्या घरी ‘निनाव’ बर्फी’ बनवू शकता.

साहित्य –

  • बेसन १ वाटी
  • गव्हाचे पीठ अर्धी वाटी
  • गूळ १ वाटी बारीक चिरलेला. (गोड आवडत असल्यास दीड वाटी घ्या)
  • नारळाचे दूध ३ वाट्या
  • साजूक तूप अर्धी वाटी
  • केशर आणि वेलची पूड आवडीप्रमाणे

कृती –

  • प्रथम बेसन आणि गव्हाचे पीठ नीट एकत्र करून घ्या.
  • तुपावर ही पिठं खमंग भाजून घ्या आणि थंड करा.
  • नारळाच्या दुधात गूळ विरघळवून घ्या.
  • त्यात केशर आणि वेलची पूड घाला.
  • हे नारळाचे दूध भाजलेल्या पिठामध्ये हळूहळू गुठळ्या होऊ न देता घाला.
  • गॅसवर ठेवून घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
  • चांगले घट्ट झाल्यावर बेकिंग पॅनला तुपाचा हात लावून त्याच्यावर नीट पसरवा.
  • वरून थोडेसे तूप सोडा. १८० -अंश सेल्सियसला २०-२५ मिनिटे बेक करा.
  • वरून खरपूस होईपर्यंत ठेवा. थंड झाल्यावर वड्या पाडून सर्व्ह करा.

आणखी वाचा – आमरस खाऊन कंटाळला असाल, तर आंब्यापासून घरच्या घरी बनवा ‘हे’ खास पदार्थ, लिहून घ्या रेसिपी

Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi
Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi : गणपती विसर्जनाच्या मित्रमैत्रिणींना द्या हार्दिक शुभेच्छा, स्टेटसला ठेवा एकापेक्षा एक सुंदर संदेश
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Low back pain: If you have lower back pain, stay a mile away from this food item
Low back pain : पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? डॉक्टरांचं ऐका आणि ‘हे’ पदार्थ पूर्णत: बंद करा
Ukdiche Modak Recipe
Ukdiche Modak : उकडीचे मोदक फुटतात? टेन्शन घेऊ नका, या टिप्स जाणून घ्या अन् बनवा स्वादिष्ट मोदक
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Ganesh chaturthi 2024 khajur ladoo recipe in marathi
Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
cravings can indicate hidden health issues and nutritional deficiencies
Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
White Onion Pickle recipe in marathi how to make white Onion Pickle in marathi
पांढऱ्या कांद्याचे चटकदार लोणचे; चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)