Simple Chicken Kofta Pizza Recipe : हॉटेल, रेस्टॉरंट किंवा पिझ्झा कॉर्नरवर मिळणारा पिझ्झा हा तुमच्यापैकी अनेकांना आवडत असेल. मुळात पिझ्झा हा भारतीय पदार्थ नाही पण तरी अनेक भारतीयांनी तो मनापासून आवडतो. अगदी लहानांपासून ते मोठे देखील पिझ्झा फार आवडीने खातात. यात घरी कोणाची बर्थ डे पार्टी असो वा विकेंड पार्टी यावेळी पिझ्झा ऑर्डर केलाच जातो. पण काही लोक घरीच पिझ्झा बनवणे पसंत करतात. त्यांच्यासाठीच आम्ही खास नॉनव्हेज पिझ्झा रेसिपी घेऊन आलो आहोत. आपण ‘चिकन कोफ्ता पिझ्झा’ कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पाहू रेसिपी..

चिकन कोफ्ता पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१) १ वाटी चिकन खिमा
२)२ चमचे कॉर्नफ्लॉवर
३) १ चमचा तांदळाचे पीठ
४) २ कांदे
५) १ चमचा गरम मसाला
६) २ कप मैदा
७) २ चमचे आले लसुण पेस्ट
८) २/५ कप कांद्याची पात
९) १ चमचा लाल तिखट
१०) १ अंड्याचा पिवळा बलक
११) १ चमचा बेकिंग पावडर
१२) १ बारीक गोल कापलेला टोमॅटो
१३) १ सिमला मिरचीचे पातळ काप
१४) २ चमचे दही
१५) १ चमचा बटर
१६) १/२ कप चिज
१७) ३ चमचे शेजवान सॉस
१८) १ कप ब्रेड क्रम्स
१९) अंड्यांची पेस्ट
२०) तळण्यासाठी तेल
२१) चवीनुसार मीठ

Samsung upcoming foldable Smartphone the Galaxy Z Fold 6 and Galaxy Z Flip 6 launch On July 10 An Unpacked event
सॅमसंगच्या ‘या’ दोन नवीन स्मार्टफोन्सची झलक तुम्ही पाहिलीत का? बॅटरी लाईफ, व्हेरिएंट अन् डिस्प्ले करेल तुम्हाला इम्प्रेस
Surmai patties recipe in marathi fish patties recipe in marathi
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत कुरकुरीत ‘सुरमई पॅटीस’ खाल तर खातच रहाल
Digital Health Incentive Scheme
यूपीएससी सूत्र : स्मार्ट सिटी मिशनची मुदतवाढ अन् ‘डिजिटल हेल्थ इन्सेटिव्ह स्कीम’, वाचा सविस्तर…
The OnePlus Nord CE 4 Lite is likely to be priced below twenty thousand read Design top specs features price India launch date
सुपरफास्ट होईल चार्ज; फक्त २० हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा OnePlus चा स्मार्टफोन; कधी होणारा लाँच?
IAS officer Shubham Gupta introduced plantable visiting cards embedded with marigold plant seeds Here is how it works
व्हिजिटिंग कार्ड नव्हे पर्यावरणाचे संरक्षण! आयएएस अधिकाऱ्यांची ‘ही’ कल्पना पाहून तुम्हीही व्हाल थक्क…
Cheapest Smartphones
‘या’ स्मार्टफोन्ससमोर iPhone ही विसरुन जाल! कमी ‘बजेट’मध्ये स्मार्ट खरेदी; पाहा यादीतील तुम्हाला परवडणारे स्मार्टफोन्स
These Amazon Alexa powered devices can be the perfect gift for your dad everyday tasks like checking news weather or playing music
स्वस्तात खरेदी करा ‘हे’ Alexa पॉवर्ड स्मार्ट स्पीकर; स्पोर्ट्स पाहणे, कन्टेन्ट शोधण्यासाठी ठरेल उपयोगी; किंमत फक्त…
One Community Sale amazing discounts and offers OnePlus foldable smartphone get a complimentary OnePlus Watch 2
One Community Sale: वनप्लसच्या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा ‘हा’ फोल्डेबल स्मार्टफोन ; कुठे सुरु आहे ‘ही’ ऑफर? जाणून घ्या

चिकन कोफ्ता पिझ्झा बनवण्याची कृती

चिकन कोफ्ता पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पिझ्झा बेस बनवून घ्यायला आहे. पिझ्झा बेस बनवण्यासाठी एका भांड्यात मैदा घ्या, त्यात बेकिंग सोडा, दही, अंड्याचा पिवळा बलक टाकून चांगले मिक्स करा, आता थोडे पाणी घालून मिश्रण चांगले मळून आणि १ तास असंच झाकून ठेवा.

यानंतर चिकन कोफ्ता बनवण्यासाठी एका भांड्यात मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला चिकन खिमा घ्या. यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले- लसुण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ हे सर्व चांगले मिक्स करा आणि आणि मिश्रणाचे चागंले लांबट घट्ट गोळा करा, यानंतर त्याचे लहान लंबगोल आकाराचे गोळे करून घ्या.

आता कढईत तेल चांगले गरम करा, यानंतर हे तयार गोले अंड्याच्या मिश्रणात बुडवून नंतर ब्रेडच्या क्रम्समध्ये घोळवून घ्या आणि गरम तेलात सोडून तळून घ्या.

आता पिझ्झा बेस बनवण्यासाठी एका प्लेटला तेल लावून घ्या आणि त्यावर मैद्याचा गोळा टाकून चांगला गोल करुन घ्या. यानंतर तयार बेसचे आठ भाग करा, यानंतर त्याला अमूल बटर लावून ते १० मिनिटे ओव्हनमध्ये बेक करा.

यानंतत पिझ्झाच्या तयार कटिंग बेसला शेजवॉन सॉस लावा. यानंतर त्यावर टोमॅटो मिरची आणि कांद्याच्या कापलेल्या चकत्या ठेवा. आता त्यावर कोफ्ता ठेवा आणि त्यावरुन चीज टाका आणि कोफ्ता ओव्हनमघ्ये २० मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा. बेक झाल्यावर वरुन पुन्हा चीज घालुन खाण्यासाठी सर्व्ह करा.