Simple Chicken Kofta Pizza Recipe : हॉटेल, रेस्टॉरंट किंवा पिझ्झा कॉर्नरवर मिळणारा पिझ्झा हा तुमच्यापैकी अनेकांना आवडत असेल. मुळात पिझ्झा हा भारतीय पदार्थ नाही पण तरी अनेक भारतीयांनी तो मनापासून आवडतो. अगदी लहानांपासून ते मोठे देखील पिझ्झा फार आवडीने खातात. यात घरी कोणाची बर्थ डे पार्टी असो वा विकेंड पार्टी यावेळी पिझ्झा ऑर्डर केलाच जातो. पण काही लोक घरीच पिझ्झा बनवणे पसंत करतात. त्यांच्यासाठीच आम्ही खास नॉनव्हेज पिझ्झा रेसिपी घेऊन आलो आहोत. आपण 'चिकन कोफ्ता पिझ्झा' कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पाहू रेसिपी.. चिकन कोफ्ता पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य १) १ वाटी चिकन खिमा२)२ चमचे कॉर्नफ्लॉवर३) १ चमचा तांदळाचे पीठ४) २ कांदे५) १ चमचा गरम मसाला६) २ कप मैदा७) २ चमचे आले लसुण पेस्ट८) २/५ कप कांद्याची पात९) १ चमचा लाल तिखट१०) १ अंड्याचा पिवळा बलक११) १ चमचा बेकिंग पावडर१२) १ बारीक गोल कापलेला टोमॅटो१३) १ सिमला मिरचीचे पातळ काप१४) २ चमचे दही१५) १ चमचा बटर१६) १/२ कप चिज१७) ३ चमचे शेजवान सॉस१८) १ कप ब्रेड क्रम्स१९) अंड्यांची पेस्ट२०) तळण्यासाठी तेल२१) चवीनुसार मीठ चिकन कोफ्ता पिझ्झा बनवण्याची कृती चिकन कोफ्ता पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पिझ्झा बेस बनवून घ्यायला आहे. पिझ्झा बेस बनवण्यासाठी एका भांड्यात मैदा घ्या, त्यात बेकिंग सोडा, दही, अंड्याचा पिवळा बलक टाकून चांगले मिक्स करा, आता थोडे पाणी घालून मिश्रण चांगले मळून आणि १ तास असंच झाकून ठेवा. यानंतर चिकन कोफ्ता बनवण्यासाठी एका भांड्यात मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला चिकन खिमा घ्या. यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले- लसुण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ हे सर्व चांगले मिक्स करा आणि आणि मिश्रणाचे चागंले लांबट घट्ट गोळा करा, यानंतर त्याचे लहान लंबगोल आकाराचे गोळे करून घ्या. आता कढईत तेल चांगले गरम करा, यानंतर हे तयार गोले अंड्याच्या मिश्रणात बुडवून नंतर ब्रेडच्या क्रम्समध्ये घोळवून घ्या आणि गरम तेलात सोडून तळून घ्या. आता पिझ्झा बेस बनवण्यासाठी एका प्लेटला तेल लावून घ्या आणि त्यावर मैद्याचा गोळा टाकून चांगला गोल करुन घ्या. यानंतर तयार बेसचे आठ भाग करा, यानंतर त्याला अमूल बटर लावून ते १० मिनिटे ओव्हनमध्ये बेक करा. यानंतत पिझ्झाच्या तयार कटिंग बेसला शेजवॉन सॉस लावा. यानंतर त्यावर टोमॅटो मिरची आणि कांद्याच्या कापलेल्या चकत्या ठेवा. आता त्यावर कोफ्ता ठेवा आणि त्यावरुन चीज टाका आणि कोफ्ता ओव्हनमघ्ये २० मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा. बेक झाल्यावर वरुन पुन्हा चीज घालुन खाण्यासाठी सर्व्ह करा.