शुभा प्रभू-साटम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

बोनलेस चिकनचे चौकोनी तुकडे, सफरचंद, ब्रोकोली, सॅलड पाने, बदाम, अक्रोड.

ड्रेसिंगसाठी – मध आणि मोहरी एकत्र कुटलेली, लिंबाचा रस, ड्राय हब्र्ज, ऑलिव्ह तेल, मीठ

कृती

तव्यावर थोडय़ाशा तेलात चिकनचे तुकडे लालसर परतून घ्यावेत. त्यामध्येच ब्रोकोलीचे तुरे आणि अक्रोड-बदामाचे तुकडे परतून घ्यावे. हे सगळं कुरकुरीत व्हायला हवं. एकीकडे चिकन होईपर्यंत बाकीची कामं करून घेऊ. सफरचंद लांबट कापून घ्यावे. सॅलडची पाने बारीक चिरून घ्यावीत. ड्रेसिंगचं सर्व साहित्य छान फेटून घ्यावे.

चिकन, ब्रोकोलीचे मिश्रण किंचित गार झाले की त्यात सफरचंदाच्या फोडी, सॅलडची पाने आणि ड्रेसिंग घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. आवडत असेल तर वरून भाजलेली अळशी, ओट्स किंवा तीळ पेरावेत. नाश्त्यासाठी हा सॅलडचा पर्यायपण एकदम भारी आहे. करून बघा नक्की!