हिवाळ्यात अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढत असतो. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने वारंवार संसर्गजन्य आजार होण्याचा धोका निर्माण होत असतो. त्याचबरोबर ज्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असते त्यांचे शरीर अनेक आजार आणि संसर्गाशी लढण्यास सक्षम असते. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्यास शरीरासाठी संरक्षक कवचासारखे काम देखील करते. हीच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला पौष्टीक आहार घेण्याची गरज आहे. चला तर मग आज बाजरीच्या पिठाचे लाडूची रेसिपी पाहूयात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
- बाजरीच्या पिठाचे लाडू साहित्य:
- बाजरीचे पीठ
- गूळ
- वेलची पावडर
- काजू, बदाम तुकडे
- तूप
बाजरीच्या पिठाचे लाडू कृती:
- बाजरीच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी, सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या. त्यानंतर त्यात बाजरीचे पीठ टाकून ते व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजा.
- त्यानंतर भाजून घेतलेल्या पीठ बाजूला काढून त्याच कढईमध्ये तूप टाकून गूळ व्यवस्थित पातळ करून घ्या.
- गूळ वितळल्यानंतर त्यात भाजून घेतलेले बाजरीचे पीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात वेलची पावडर आणि काजू, बदाम तुकडे टाकून मिक्स करा.
हेही वाचा >> चविष्ट अन् पौष्टिक, निरोगी आरोग्यासाठी हिवाळ्यात करा नाचणीच्या पिठाचे सूप; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
- तयार केलेले पिठाच्या तुमच्या आवडीनुसार लाडू बनवून सर्व्ह करा. तयार आहेत बाजरीचे लाडू.
तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. याकरिता विशेषत: तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी युक्त गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.
First published on: 20-01-2025 at 12:44 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutritious laddoo of millet flour bajarichya pithache ladoo recipe in marathi srk