अनेक लोकांना दहीवडा खूप आवडतो पण अनेकदा वजन वाढीच्या भीतीने अनेकजण दहीवडा खाणे टाळतात. आज आम्ही तुम्हाला ओट्स आणि मूगडाळपासून हेल्दी दहीवडा कसा बनवायचा याविषयी सांगणार आहे.
हा ओट्स-मूगडाळ दहीवडा शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. यामध्ये ४०० किलो कॅलरीज, २८.२ ग्रॅम प्रोटिन्स, ९.४ ग्रॅम फायबर, ८१.३ मि.ग्रॅम फोलेट, १२१.९ मि.ग्रॅम कॅल्शियम आणि ४.४५ मि.ग्रॅम आयर्नचा समावेश आहे. चला तर ओट्स-मूगडाळ दहीवडा रेसिपी जाणून घेऊया.
हेही वाचा : उन्हाळ्यात प्या हेल्दी ज्यूस, बीट-गाजर ज्यूस कसा बनवायचा ? पाहा सोपी रेसिपी
साहित्य –
वड्याकरिता
- भाजून पूड केलेले ओट्स अर्धा कप
- उडीद डाळ पाव कप
- मूगडाळ अधा कप
- हिरवी मिरची १
- कडीपत्ता ३-४ पाने
- आलं १ छोटा तुकडा
- मीठ चवीनुसार
- तेल तळण्याकरिता
दह्याच्या मिश्रणाकरिता
- दही १ कप
- साखर १ चमचा
- मीठ चवीनुसार
- जिरे पूड पाव चमचा
- लाल तिखट पाव चमचा
हेही वाचा : Mixed Dal Kheer : गोड आणि हेल्दी खायचंय? मग अशी बनवा मिश्र धान्यांची खीर
कृती –
- उडीद डाळ आणि मूगडाळ स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सर्व पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून तीन-चार तासांकरिता ठेवा.
- त्यानंतर त्यामध्ये ओट्स पावडर आणि मीठ घालून ठेवा.
- ५ मिनिटांनंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कडीपत्ता, आलं घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून काढा.
- वड्याचा आकार देऊन तळून घ्या. नंतर पाण्यात घालून हाताने दाबून घ्या. दह्यामध्ये साखर, मीठ, जिरे पूड आणि लाल तिखट एकत्र करा.
- वड्यावर हे दही घाला.
- १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून खाण्यास द्या.