Oats Dosa : ओट्स हा आरोग्यासाठी चांगला पदार्थ आहे. वजन कमी करण्यासाठी सुद्धा ओट्सचा खाण्याचा सल्ला दिला जातो. काही लोकांना ओट्स खायला आवडत नाही पण आज आम्ही तुम्हाला ओट्स पासून बनवता येणारी हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही कधी ओट्स डोसा खाल्ला आहे का? आज आपण ओट्स डोसाची कसा बनवायचा, हे जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

  • ओट्स
  • दही
  • तेल
  • तूप
  • पाणी
  • मीठ

हेही वाचा : Methi Shankarpali : दिवाळीला बनवा पौष्टिक मेथीचे शंकरपाळे; ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती :

  • सुरुवातीला ओट्स घ्या
  • त्यात थोडे पाणी टाका आणि मिक्सरमधून बारीक करा
  • त्यानंतर त्यात चवीनुसार थोडं दही घाला.
  • त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • नॉन स्टिक तवा गरम करा आणि या तव्यावर थोडं तेल टाका.
  • या गरम तव्यावर मिश्रण डोसासारखे पसरवा
  • त्यावर तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता. तेल किंवा तूप चांगले पसरून घ्या
  • डोसा एका बाजूलाच चांगला भाजा
  • हा डोसा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oats dosa recipe how to make healthy oats dosa healthy food for diet ndj