How to Make Oats Oats Ladoo: सकाळचा नाश्ता हा केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर शरीराला ऊर्जा देण्यासाठी सुद्धा केला जातो. पण, आपल्यातील अनेक जण सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी नाश्ता करायला खूपच कंटाळा करतात. काही जणांना सकाळी खाल्लं की, मळमळल्या सारखं होतं. तर सकाळी चहा, पोळी-भाजी असा नाश्ता कारण्याऐवजी छोटा लाडू खाणं हा बेस्ट पर्याय ठरेल. आता तुमच्या समोर प्रश्न पडला असेल की, नेमका कोणता लाडू खायचा ; ज्यात चवही असेल आणि त्यातून पोषणही मिळेल. तर आपल्यातील अनेक जण दिवसाची सुरुवात नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करून करतात. तर आज आपण हेच लक्षात ठेवून ओट्स, मेथीचे पौष्टीक लाडू बनवणार आहोत. तर हे लाडू कसे बनवायचे चला पाहू…

साहित्य :

Crispy Rava Vada recipe
एक वाटी रव्यापासून झटपट बनवा कुरकुरीत रवा वडे; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Roasted Chicken Salad recipe in marathi Roasted Chicken Salad recipe
केरळ स्पेशल रोस्टेड चिकन सॅलड; संडे स्पेशल ही…
Home Made Maggi
Home Made Maggy: चटपटीत नाश्त्यासाठी बनवा गव्हाच्या पिठापासून मॅगी; लहान मुलं होतील खूश
Amla chutney recipe
हिवाळ्यात खा पोषणमूल्यांनी परिपूर्ण आवळ्यांची चटणी! झटपट लिहून घ्या रेसिपी
khakra chaat recipe
सायंकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा कुरकुरीत खाकरा चाट, लिहून घ्या स्ट्रीट स्टाइल चाट रेसिपी
How To Make Winter Special laddoo
Winter Special laddoo : पाव किलो हरभरा, गुळापासून हिवाळ्यात बनवा पौष्टिक लाडू; २० मिनिटांत होणारी झटपट रेसिपी नक्की ट्राय करा
rice medu vada in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत झटपट बनवा तांदळाचे मेदूवडे; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Solebhaat Recipe
सोलेभात कधी खाल्ला का? तुरीच्या दाणे घालून करा मसाले भात; सोपी रेसिपी एकदा पाहाच, VIDEO VIRAL

१. एक वाटी ओट्स
२. काजू , बदाम, पिस्ता (सुका मेवा)
३. तीळ, तूप
४. सुके खोबरे (किसलेले)
५. गूळ (काळा गूळ) ऐवजी तुम्ही खारीक पावडर / साधा गुळ / साखर सुद्धा वापरू शकता.
६. वेलची, जायफळ
७. एक चमचा मेथी दाणे – आवडीनुसार

हेही वाचा… Palak Vadi: पालकची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा अर्धी जुडी पालकच्या खमंग, कुरकुरीत वड्या; रेसिपी लगेच लिहून घ्या

कृती :

१. सगळ्यात पहिला पॅनमध्ये ओट्स भाजून घ्या.
२. नंतर एक चमचा तुपामध्ये सुका मेवा म्हणजेच काजू , बदाम, पिस्ता आणि वेलची, जायफळ भाजून घ्या.
३. त्यानंतर किसलेले सुके खोबरे आणि मग मेथी दाणे, तीळ सुद्धा भाजून घ्या. (टीप : सगळे पदार्थ वेगवगेळे मंद आचेवर भाजून घ्या)
४. गुळ किसून घ्या .
५. जर तुम्हाला लाडूमध्ये नैसर्गिक गोडवा हवा असेल तर खजूर भाजून त्याची पावडर करून घ्या.
६. सगळे पदार्थ तुम्ही जे भाजून घेतले आहेत. ते एकेक करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या.
७. हे बारीक करून घेतलेलं पदार्थ एका भांड्यात काढून एकजीव करून घ्या.
८.एक वाटी तूप कडवून घ्या.
९. तूप मिश्रणात ओतून व व्यवथित एकजीव करून घ्या.
१०. आता एकजीव केलेलं पदार्थ पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्या.
११. लाडू वळण्यासाठी मिश्रण तयार.
१२. अशाप्रकारे तुमचे ओट्सचे लाडू ( Oats Ladoo) तयार.

ओट्स खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात बीटा-ग्लुकन्स असतात; जे एक प्रकारचे विरघळणारे फायबर आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते; जी बाब हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास साह्यभूत ठरते. ओट्समधील विरघळणारे फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. त्याचबरोबर मधुमेह असलेल्यांसाठी हा योग्य पर्याय मानला जातो.ओट्स खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठता, गॅसची समस्यांपासून दूर राहता येते. तर अशा आरोग्यदायी फायदे असणारे ओट्सचे तुम्ही पौष्टीक आणि चविष्ट लाडू करू शकता.