Oil Free Fish Curry recipe: रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.नॉनव्हेज आवडणाऱ्या लोकांना चिकनसारखे विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात.  तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल चमचमीत अशी ऑईल फ्री फिश करी रेसिपी घेऊन आलो आहोत.

ऑईल फ्री फिश करी साहित्य

  • २ मध्यम आकाराचे पापलेट
  • १ टेबलस्पून हळद आणि मीठ (मॅरीनेशनसाठी)
  • ४-५ कडीपत्ता पाने
  • २ कप पाणी
  • चवीनुसार मीठ
  • ग्रेव्ही मसाला साहित्य:
  • १ कप किसलेला ओला नारळ
  • ६-७ काश्मीरी लाल सुक्या मिरच्या (भिजवून ठेवलेल्या)
  • १/२ कप पाण्यात भिजवलेला लिंबाऐवढा चिंचेचा कोळ
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ कांदा
  • १ टेबलस्पून धणे
  • १ टीस्पून काळीमिरी
  • १ टीस्पून जीरे
  • १ इंच आल्याचा तुकडा

ऑईल फ्री फिश करी कृती

१. प्रथम पापलेट स्वच्छ धुवून, त्याला दोन्ही बाजूंनी कट देऊन हळद व मीठ लावून १०-१५ मिनीटे मॅरीनेट करावे. मग ग्रेव्ही मसाला साहित्य एकत्र करुन त्याची स्मूद पेस्ट तयार करावी.

२. नंतर एका खोलगट कढईमधे तयार केलेली मसाला पेस्ट घ्यावी आणि गरजेनुसार पाणी घालून मिश्रण उकळायला ठेवावे व चवीनुसार मीठ घालावे.

३. वरील ग्रेव्हीला चांगली उकळी आली की, त्यात मॅरीनेट केलेले पापलेट अलगत ठेवावे आणि झाकण ठेऊन ३-४ मिनीटे मध्यम आचेवर शिजवावे. (ग्रेव्हीमधे पापलेट न हलवताच शिजवावे)

हेही वाचा >> जबरदस्त चवीचा चिकन मसाला; एकदा खाल खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी

४. आता तयार झालेली फिश करी, एका प्लेटमधे काढून कडीपत्ता आणि हिरवी मिरची गार्निश करुन सर्व्ह करावी. ही करी राईस, पराठा किंवा नान सोबत छान लागते.