Viral Video : भेळ हा शब्द उच्चारला तरी तोंडाला पाणी सुटतं. भेळ ओली असो किंवा सुखी, भूक लागली की लगेच बनवता येईल अशी डिश आहे. खरं तर भेळ ही एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. अनेकदा आपण बाहेरची भेळ खातो पण बाहेरची भेळ तितकी आरोग्याच्या दृष्टीने हेल्दी नसते पण तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट अशी भेळ बनवू शकता. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाड्यावर मिळते तशी ओली भेळ घरी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगितली आहे. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –
साहित्य
- चिंच
- खजूर
- गूळ
- चाट मसाला
- जिरा पावडर
- काळ मीठ
- लाल तिखट
- मीठ
- चुरमुरे
- फरसान आणि बुंदी
- मीठ
- चाट मसाला
- जिरा पावडर
- काळ मीठ
- लाल तिखट
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिकलेला टोमॅटो
- बारीक चिरलेली काकडी
- बारीक चिरलेली कच्ची कैरी
- कोथिंबीर
- लिंबू
- शेव
कृती
भिजवलेले चिंच आणि खजूर घ्या आणि त्याची बारीक पेस्ट करा. ही पेस्ट गाळून घ्या. त्यानंतर एक कढई घ्या आणि कमी आचेवर या कढईत ही पेस्ट टाका आणि त्यात गूळ टाका आणि शिजवून घ्या. त्यानंतर त्यात चाट मसाला, जिरा पावडर, काळ मीठ, लाल तिखट टाका. नीट मिक्स करा. चवीनुसार मीठ टाका. चटपटीत चटणी तयार होईल.
एका भांड्यामध्ये चुरमुरे घ्या. त्यात फरसान आणि बुंदी टाका. त्यानंतर त्यात मीठ, चाट मसाला, जिरा पावडर, काळ मीठ आणि लाल तिखट टाका. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिकलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेली कच्ची कैरी आणि कोथिंबीर टाका आणि शेवटी तयार केलेली चटणी टाका. सर्व मिश्रण एकत्र करा. एका प्लेटमध्ये टाका. त्यात वरून कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव टाका आणि वरून लिंबाचा रस पिळा. गाड्यावर मिळते तशी चटपटीत भेळ तयार होईल.
पाहा व्हिडीओ
swast_ani_mast_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गरमीमुळे तोंडाची चव गेली आहे, मग ही भेळपुरी नक्की खा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना ही रेसिपी आवडली आहे.