Jaggery Makhane Recipe: श्रावणी सोमवारी, शनिवारी अनेकजण उपवास करतात. या दिवशी आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं देखील गरजेचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे वडे, इडली असे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील, मात्र आज आम्ही तुम्हाला उपवासाचा पौष्टिक गूळ मखाणा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.
गूळ मखाणा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ कप मखाना
- ३ चमचे गूळ पावडर
- ४ चमचे तूप
गूळ मखाणा बनवण्याची कृती:
हेही वाचा: उपवासाच्या दिवशी फक्त ५ मिनिटांत झटपट बनवा मखाण्याचा चिवडा; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
- सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप टाकून त्यावर मखाणे टाकून छान परतून घ्या.
- मखाण्याला सोनेरी रंग आल्यानंतर गॅस बंद करा.
- आता दुसऱ्या पॅनमध्ये तूप टाकून करून गरम करा आणि त्यात
२ चमचे गूळाची पावडर टाकून मिक्स करून घ्या. - आता गूळाचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये भाजलेले मखाणे टाका आणि व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
- आता ५-६ मिनिटांनी गॅस बंद करून गरमागरम मखाणे सर्व्ह करा.