Onion Chutney Recipe : असं म्हणतात की सिंहगडावर खूप सुंदर जेवण मिळते. या जेवणाची चव वाढवणारी येथील चटणी खूप लोकप्रिय आहे. जर तुम्हाला सिंहगडावरील चटणीचा घरी बसून आस्वाद घ्यायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सिंहगड स्टाईल कांद्याची चटणी कशी बनवायची, हे सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊ या.
साहित्य
कांदे
लाल तिखट
मीठ
तेल
हिंग पावडर
हेही वाचा :Rava Puri Recipe : पाडव्याला करा लुसलुशीत गोड रवा पुरी; ही स्वादिष्ट रेसिपी लगेच नोट करा
कृती
कांदे बारीक चिरून घ्या.
त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका
सर्व मिश्रण एकत्र करा.
त्यानंतर तेल कडक गरम करुन घ्या
या तेलात हिंग पावडर टाका आणि त्यानंतर हे तेल या कांद्यावर मिश्रणावर टाका.
तेल मिक्स चांगल्याने करुन घ्या
सिंहगड स्टाईल कांद्याची चटणी तयार होणार.
(टीप : ही चटणी वेळेवर बनवावी)