Oreo mini cake recipe: लहान मुलांना केक खूप आवडतो. अगदी आवडीने ते केक खातात. कोणाच्या बर्थडेला किंवा कोणत्या पार्टीत खाल्लेला हा केक अनेकदा घरच्या घरी बनवायचा विचार अनेकजण करतात. पण यात खूप वेळ वाया जाईल म्हणून कोणी कष्ट घ्यायला मागत नाही. पण आता अगदी भलामोठा केक न बनवता तुम्ही झटक्यात घरच्या घरी मिनी केक बनवू शकता. आज आपण अशाच ओरिओ मिनी केकची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
१०-१५ ओरिओ बिस्किटे
१ कप दूध
बेकिंग सोडा
चॉकलेट
चॉकलेट सिरप
ओरिओ मिनी केक रेसिपी
प्रथम एका मिक्सरमध्ये १०-१५ बिस्किटे घ्या आणि मिक्स करा.
त्यात १ कप दूध आणि बेकिंग सोडा घाला आणि त्याचं बॅटर तयार करा.
अप्पम पॅन घ्या, ते ग्रीस करा आणि त्यावर ओरिओ बॅटर घाला.
त्यानंतर त्यावर चॉकलेटचे तुकडे ठेवा आणि दोन्ही बाजूने कमी आचेवर शिजवा.
तुमचा मिनी ओरिओ केक तयार आहे.
त्यावर चॉकलेट सिरप घाला आणि स्प्रिंकल्सने गार्निश करा.
पाहा VIDEO
*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.