Pakoda Roll Bites Recipe: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण नेहमी खात असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो.
पावसाळा असो हिवाळा असो, भजी, पकोडे नेहमीच खाण्याचं मन करतं. पण आज आपण एक वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि क्रिस्पी, चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया पकोडा रोल बाईट्सची रेसिपी.
हेही वाचा… Chilli Paneer Recipe: कुरकुरीत, चवदार ‘चिली पनीर’ कधी घरी बनवलंय का? मग ही रेसिपी नक्की वाचा
साहित्य
ब्रेड
बटाटा (उकडलेला)
कांदा
बेसन
हिरवी मिरची
हळद
लाल मिरची पूड
गरम मसाला
मीठ
हेही वाचा… ‘पोटॅटो ब्रेड रोल’ची जबरदस्त सोपी मराठी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल
कृती
१. एक ब्रेड घ्या. त्याच्या कडा कापून घ्या.
२. बटाट्याचं स्टफिंग त्या ब्रेडवर पसरवून घ्या आणि रोल करा.
३. एका भांड्यात एक चिरलेला कांदा, ५ टेबलस्पून बेसन, १ चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पूड, गरम अर्धा टेबलस्पून मसाला आणि अर्धा टेबलस्पून मीठ घाला.
४. आता त्यात पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या.
५. ब्रेड रोलला बेसनच्या बॅटरने आवरण घाला आणि मध्यम आचेवर तळा.
६. तुमचे कुरकुरीत आणि स्वादिष्ट रोल बाइट्स तयार आहेत. आनंद घ्या.
ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.