पालक आरोग्यास गुणकारी अशी भाजी आहे. भारतात अनेक जण आपल्या आहारात पालकाचा समावेश करतात. त्यापासून अनेक खाद्यपदार्थही बनवले जातात. लुसलुशीत हिरवीगार पालक भाजी येण्याचा हिवाळ्यात सिजन असतो आणि हिवाळ्यात पालकाच्या हिरव्या पानांमध्येही जास्तीत जास्त पोषणघटक आपोआप तयार होत असतात. इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत पालक भाजी ही निवडायला आणि भाजी तयार करायला देखील सोपी आहे. आज आम्ही तुम्हाला पालकाची गरगट्टी भाजी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर पाहुयात पालकाची गरगट्टी भाजी कशी बनवायची…

पालकाची गरगट्टी भाजी साहित्य

  • १ पालकाची कधी
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • ३-४ लसुन
  • २ चमचे शेंगदाण्याचा कूट
  • १ चमचे डाळीचे पीठ
  • १ चमचा मोहरी
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा मिरची पावडर
  • १/२ चमचा हळद
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ
  • तेल

पालकाची गरगट्टी भाजी कृती

स्टेप १
पालक स्वच्छ निवडून धुवून त्याला ब्न्लाच करणे. त्यानंतर गरम पाण्यातून पालक काढून त्यावर गार पाणी टाकावे. त्यामुळे पालकाचा कडूपणा निघून जातो.

स्टेप २
लसूण हिरवी मिरचीची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी तसेच पालकाची पेस्ट तयार करून घ्यावी. मोहरी जिरे हिंग यांची गरम तेलात फोडणी करून त्यात मिरची पावडर आणि हळद टाकावे.

स्टेप ३
तसेच त्यामध्ये लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट आणि बेसन पीठ टाकावे.चिमटभर मीठ टाकून ते सर्व नीट मिक्स करून एक मिनिटभर परतून घ्यावे. पालकाची पेस्ट मिक्स करून त्यामध्ये तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी तितके त्यामध्ये पाणी टाकावे.

हेही वाचा >> हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज मराठा रेसिपी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेप ४
वरून चवीनुसार मीठ टाकून भाजी चार ते पाच मिनिटं शिजू द्यावी. आपली पालकाची गरगट्टी भाजी तयार आहे. गरमागरम पालकाची गरगट्टी भाजी चपाती भाकरी बरोबर छान लागते.