तुम्ही अनेक प्रकारचे कबाब खाल्ले असतील. पण तुम्ही कधी व्हेज कबाबचा आस्वाद घेतला आहे का? जर नसेल तर या वेळी रात्रीच्या जेवणासाठी पालक कबाब बनवा. हे अतिशय सहजपणे तयार केले जातात. या वेळी पालक पकोडे नको, पालक कबाबने आपल्या प्रियजनांना खूश करा. पालक कबाब कसा बनवायचा ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालकाचे कबाब बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

  • पालक
  • काजू
  • जिरे पावडर, हिंग
  • दही, कोथिंबीर
  • ओवा, तेल
  • बेसन, मीठ

पालकाचे कबाब बनवण्याची कृती –

  • पालक कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊल मध्ये कापलेले रोस्टेड काजू घ्या. त्यात जिरे पावडर, हिंग आणि कोथिंबीर मिक्स करून स्टफिंग तयार करून घ्या.
  • आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात हिंग, जिरे आणि ओवा टाका. आता यात चिरलेले पालक टाकून काही मिनीटे शिजू द्या. हे एका ब्लाऊल मध्ये काढून घ्या.
  • आता यात दोन चमचे दही, बेसन आणि चवीनुसार मीठ टाका आणि नीट मिक्स करून घ्या. नंतर हे थोडे मिश्रण हातावर घेऊन याचे गोल करून त्यात स्टफिंग ठेवा आणि पररत कव्हर करत नीट चापट आकार द्या.
  • चपटे गोल कबाब बनवताना स्टफिंग बाहेर निघणार नाही याची काळजी घ्या. आता एका पॅन मध्ये थोडे तेल घेऊन ते गरम करा. नंतर त्यात कबाब ठेवून ते शॅलो फ्राय करून घ्या.

हेही वाचाMonsoon recipe: पावसाळ्यात बनवा गरमा गरम ‘पनीर लॉलीपॉप’, १० मिनिटांत होईल तयार

  • छान गोल्डन ब्राऊन रंग आला म्हणजे तुमचे कबाब रेडी आहेत. गरमा गरम सर्व्ह करा. तुम्ही हे चटणी, सॉस, चहा किंवा कॉफी सोबत सर्व्ह करू शकता. कबाब डीप फ्राय करण्यापेक्षा ते शॅलो फ्राय केलेले चांगले लागतात तसेच ते हेल्दी देखील असतात.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palak kabab recipe in marathi easy palak kabab recipe for breakfast try marathi recipe srk
First published on: 28-07-2023 at 16:41 IST