Palak Pohe Vade Recipe: वडे आरोग्यास पोषक असतात कारण यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून आपण हे वडे बनवू शकतो. आज आपण पालक पोहे वडे कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. पालक पोहे वडे सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकतो. झटपट होणारा हा पदार्थ सर्वांना आवडतो आणि लहान मुलं तर हा पदार्थ खूप आवडीने खातात.
साहित्य
- पालक – २ वाटी
- पोहे – १ वाटी
- साबुदाणा – १/२ वाटी
- हिरवी मिरची – ४
- दही – १ वाटी
- कोथिंबीर – १/२ वाटी
- खाण्याचा सोडा – चिमूटभर
- मीठ – चवीनुसार
कृती
प्रथम साबुदाणा साधारण ७ ते ८ तास भिजत घालावा.
पोहे १ मिनिट पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी काढून ते १० मिनिटे झाकून ठेवावे.
पालक बारीक चिरून घ्यावा. नंतर भिजलेल्या पोह्यात पालक, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, खाण्याचा सोडा चिमूटभर, कोथिंबीर टाकावी. सर्व जिन्नस हाताला तेल लावून एकजीव करावे.
भिजलेला साबुदाणा मिश्रणात घालावा व मिश्रण एकजीव करावे.
प्लास्टिक कागदावर वडे थापावे. व गुलाबी होईपर्यंत तळावे.
आता तळलेले वडे प्लेट मध्ये काढून त्यावर दही घालावे. वरून कोथिंबीर टाकून सजावट करावी. आता वडे खाण्यास तयार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd