Palak Pulao Recipe : आज जेवणाला काय बनवायचं? हा प्रश्न प्रत्येकाला दररोज पडतो. नेहमी नेहमी एकच भाजी भात पोळी वरण खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज आपण हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी पालक पुलाव खाल्ला का? हो पालक पुलाव. अत्यंत चविष्ठ, पौष्टिक असा पालक पुलाव बनवायला आणखी सोपा आहे.सध्या असाच एक रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चवदार पालक पुलाव कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहे.

या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

  • तांदूळ १ वाटी
  • पालक १ जुडी
  • तेल
  • तमालपत्र २
  • दालचिनी
  • लवंग २-३
  • काळीमिरी ५-६
  • काजू ६-७
  • हिरवी मिरची ३-४
  • लसूण ८-१०
  • आलं १/२ इंच
  • कोंथिबीर
  • स्विटकॉन २ टे स्पून
  • हिरवे मटार २ टे स्पून
  • गरम मसाला १/२ टी स्पून
  • मीठ

हेही वाचा : Kothimbir Vadi Recipe: बाहेरून कुरकुरीत अन् आतून मऊ ‘कोथिंबीर वडी’; VIDEO तून पाहा अनोखी पद्धत; रेसिपी लिहून घ्या पटकन

कृती

  • सुरुवातीला तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे.
  • त्यानंतर २० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवायचे.
  • कुकर गॅसवर ठेवायचा आणि त्यामध्ये पावणे दोन वाटी पाणी घालायचे.
  • त्यानंतर त्यात मीठ, तेल आणि लिंबाचा रस घालायचा.
  • त्यानंतर भिजवलेले तांदूळ घालायचे.
  • मध्यम आचेवर तांदूळ एक शिट्टी होईपर्यंत शिजवायचे.
  • त्यानंतर एका पातेल्यात पाणी टाका आणि हे पातेले गॅसवर ठेवा.
  • त्यानंतर त्यात मीठ घाला आणि पालक टाका. पालक दोन मिनिटे शिजवून घ्या.
  • त्यानंतर लगेच पालक मिक्समध्ये बारीक करून पालकची पेस्ट करा.
  • त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करा. त्यात तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी टाका.
  • त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाका.
  • त्यानंतर त्यात हिरवे वाटाणे, मक्याची दाणे आणि काजू टाका.
  • त्यानंतर त्यात गरम मसाला, चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेली पालकची पेस्ट टाका.
  • त्यानंतर थंड झालेला भात त्यात टाका.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि हा चांगला शिजवून घ्या.
  • पालक पुलाव तयार होईल.

पाहा व्हिडीओ

vaishalisrecipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रात्रीच्या जेवणासाठी चविष्ट व पौष्टिक पालक पुलाव”
हा पालक पुलाव तुम्ही वीकेंडला बनवू शकता. तुम्ही हा एकदा बनवून खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला आवडेल. चवीला अप्रतिम असलेला पालक पुलाव तितकाच आरोग्यासाठी पौष्टिक सुद्धा आहे.त्यामुळे लगेच रेसिपी नोट करा आणि तुमच्या जेवणाच्या मेन्युमध्ये या पुलावचा समावेश करा.