Palak Puri Recipe : आपल्यापैकी अनेकांना पालक आवडत असेल. अनेकदा आपण पालकाची भाजी बनवून खातो. पण जर तुम्ही पालकाची भाजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही पालकापासून एक हटके रेसिपी करू शकता. तुम्ही पालक पुऱ्या कधी खाल्ल्या का? हो, पालक पुऱ्या या चवीला स्वादिष्ट आणि तितक्याच पौष्टिक आहे. आज आपण पालक पुऱ्या कशा बनवायच्या? हे जाणून घेणार आहोत.
साहित्य
- पालक
- बर्फ
- धने पूड
- जिरे पूड
- काळी मिरी पूड
- आलं
- हिरवे मिरचे
- लाल तिखट
- मीठ
- गव्हाचं पीठ
- कोथिंबीर
- तेल
हेही वाचा : नाश्त्यात पोहे, उपमा खाऊन कंटाळलात? फक्त दहा मिनिटांमध्ये बनवा हेल्दी रवा अप्पम, पाहा ही सोपी रेसिपी
कृती
- सुरुवातीला पालकची पाने स्वच्छ निवडून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवा.
- एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.
- पाणी उकळल्यानंतर त्यात पालकाची पाने दोन ते तीन मिनिटे शिजू द्या.
- त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात बर्फ टाका. त्यानंतर या पाण्यात शिजवलेली पालकाची पाने टाका.
- त्यानंतर या पालकाच्या पानांना मिक्सरमधून बारीक करा.
- त्यात काळी मिरी पुड, धने पूड, जिरे पूड, आलं आणि मिरच्याची पेस्ट घाला.
- त्यात प्रमाणानुसार गव्हाच पीठ टाका. त्यात चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घाला.
- त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- आणि सर्व मिश्रण एकत्र करा
- पीठ चांगले मळून घ्या.
- कमीत कमी अर्धा तास मळलेले पीठ झाकून ठेवावे.
- छोटे छोटे गोळे करायचे आणि त्याच्या पुऱ्या लाटा.
- या पुऱ्या मंद आचेवर गरम तेलातून तळून घ्या.
- या पालक पुऱ्या तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.