Palak Vadi Recipe Video : सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात अनेकजण आवडीने पालेभाज्या खातात. त्यात सर्वात जास्त पालक आणि मेथीवर सर्व जण ताव मारतात. पालक आणि मेथीच्या भाजीसह यापासून विविध पदार्थ तयार करतात. उदा. पालक भजी, पालकाचे वरण, पालक पनीर, पालक पुलाव, पालक पुऱ्या, पालक पराठे इत्यादी. पण तुम्ही कधी पालक वडी खाल्ली आहे का? हो, पालक वडी. चवीला अप्रतिम आणि स्वादिष्ट असलेली पालक वडी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला एक व्हायरल व्हिडीओ पाहावा लागले. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पालक वडी कशी तयार करायची, याची एक सोपी रेसिपी सांगितली आहे.
व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
साहित्य
- पालक
- लसूण
- जिरे
- हिरवी मिरची
- धनेपुड गरम मसाला पावडर
- लाल मिरची पावडर
- हळद पावडर
- मीठ
- तिळ
- तांदळाचे पीठ
- बेसन
- पाणी
हेही वाचा : सकाळी नाश्त्यासाठी बनवा ‘पालक पोहे वडे’, ही रेसिपी लहान मुलं अगदी आवडीने खातील, वाचा साहित्य आणि कृती
कृती
- सुरुवातीला हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरमधून बारीक करा.
- त्यानंतर एका भांड्यामध्ये बारीक चिरलेली पालक घ्या
- त्यात धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ टाका
- त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ टाका.
- त्यात थोडी तिळ टाका.
- त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेली हिरवे मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाका.
- थोडे पाणी टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.
- हाताला तेल लावून या मिश्रणाचे लांबसर असे दोन तीन मोठे गोळे करा.
- त्यानंतर गॅसवर एक भांडे ठेवा. त्यात पाणी गरम करा पाण्याला उकळी आली की त्यावर स्टीलची चाळणी ठेवा. त्यावर हे दोन तीन मोठे मिश्रणाचे गोळे ठेवा आणि त्यावर प्लेट झाका.
- १५ मिनिटानंतर प्लेट उचला. आणि चिमट्याने ते गोळे बाहेर काढा
- त्या गोळ्याचे छोटे छोटे काप करा.
- आणि हे काप मंद आचेवर गरम तेलातून तळून घ्या.
- अप्रतिम अशा पालक वडी तयार होईल. ही पालक वडी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
wefamily18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाराष्ट्रीयन रेसिपी पालक वडी”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही पण अशाच करतो वड्या.. मस्त स्वादिष्ट वाटतात.” तर एका युजरने विचारले आहेत, “किती दिवस तयार करून ठेवू शकतो?” तर यावर wefamily18 या अकाउंटवरून उत्तर दिले आहे, “एक आठवडा”