कितीही फास्ट फूड खाल्लं, तरी घरच्या जेवणाची सर त्याला येणार नाही असं म्हटलं जातं. आपल्याकडे प्रामुख्याने डाळ-भात हे पदार्थ दररोज खाल्ले जातात. काहीजणांसाठी हे साधं जेवण कम्फर्ट फूड असतं. पण तीच एका प्रकारची डाळ खाऊन कधी खूप कंटाळा आला आहे असं आपल्यापैकी बऱ्याच लोकांबरोबर झालं असेल. अशा वेळी काहीतरी वेगळं, थोडं हटके खायचंय, नवीन ट्राय करायचंय असा विचार जर तुमच्या मनात आला असेल, तर राजस्थानची खास पंचरत्न डाळ चांगला पर्याय ठरु शकतो. लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत राजस्थानची खासियत असलेली पंचरत्न डाळीची सोपी रेसिपी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Propose Day: स्वत:च्या हातांनी रेड व्हेलवेट केक बनवून करा प्रपोझ, जाणून घ्या सोपी रेसिपी

डाळ हे प्रथिने (Proteins) यांचे प्रमुख स्रोत आहेत. म्हणूनच दैनंदिन आहारामध्ये डाळींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये खाल्या जाणाऱ्या पंचरत्न/पंचमेल डाळमध्ये नेहमीपेक्षा पाचपट गुणधर्म असतात. शरिरासाठी उपयुक्त असलेला हा पौष्टिक पदार्थ अत्यंत चविष्ट असतो.

पंचरत्न डाळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

  • अर्धी वाटी उडीद डाळ
  • अर्धी वाटी बरबटी डाळ (चवळीची डाळ/ लोबिया)
  • अर्धी वाटी मूगडाळ
  • अर्धी वाटी तूरडाळ
  • अर्धी वाटी हरभरा डाळ
  • सैंधव चवीनुसार
  • एक कांदा
  • अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट
  • कढीपत्ता
  • दोन चमचे तेल
  • पाव चमचा जिरे
  • दोन लाल मिरच्या
  • पाव चमचा हळद

पंचरत्न डाळ तयार करण्याची कृती :

  • वरील पाचही डाळी एकत्र करुन शिजवून घ्याव्यात.
  • एका पातेल्यामध्ये तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा घालूून त्या मिश्रणाला तांबडा रंग येईपर्यंत परतावे.
  • पुढे त्यामध्ये कढीपत्ता, लाल मिरच्यांचे तुकडे, हळद, सैंधव घालावे.
  • शिजलेल्या डाळी घालून आवश्यक तितक्या प्रमाणामध्ये पाणी घालावे आणि उकळी येऊ द्यावी.
  • तयार झालेली पंचरत्न डाळ बाटीबरोबर खावी.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchratna dal recipe in marathi easy to make rajasthan special dish yps