Paneer Bhaji Recipe: पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्या असतील. त्यात पनीर टिक्का, पनीर क्रिस्पी, पनीर टिक्का अशा रेसिपी अनेकदा घरीही आपण बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आपल्याला सगळेच पदार्थ घरी बनवणं जमत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाश्त्यासाठी काहीतरी खुसखुशीत क्रिस्पी म्हणून अनेकदा आपण कांदा भजी आणि बटाटा भजी बनवतो. पण आज आपण घरच्या घरी झटपट बनेल अशी ‘पनीर भजी’ची रेसिपी बनवणार आहोत.

हेही वाचा… सकाळी झटपट नाश्ता बनवायचाय? मग एक वाटी बेसनापासून बनवा ‘ही’ सोपी रेसिपी

साहित्य

२५० ग्रॅम पनीर

१०० ग्रॅम बेसन

१ टेबल स्पून आले-लसूण पेस्ट

१ टीस्पून लाल तिखट

१/२ टीस्पून हळद

१ टीस्पून ओवा

१ टेबल स्पून कोथंबीर चिरलेली

१ टेबलस्पून गरम तेल मोहन साठी

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

हेही वाचा… १५ मिनिटांत ‘कैरीचं लोणचं’ बनवायचंय? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, लगेच वाचा साहित्य आणि कृती

कृती

प्रथम पनीरचे काप करून घ्या.

मग एका बाऊलमध्ये बेसन, हळद लाल तिखट ओवा कोथंबीर आले-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ अ‍ॅड करा.

आता यात एक टेबलस्पून गरम तेल अ‍ॅड करा आणि मग पाणी घालून स्मूद पेस्ट बनवा.

यात पनीरचे तुकडे चांगले कोट करून तळून घ्या.‌

ही भजी पुदिना चटणीबरोबर छान लागेल.

नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.