Paneer Bhurji : पनीर हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. आपण पनीरपासून पनीर चिली, पनीर भुर्जी, पनीर कबाब, पनीर सँडविच, पनीरची भजी, स्टफ पनीर पराठा, पनीर पुलाव असे कितीतरी स्वादिष्ट पदार्थ आपण बनवित असतो पण तुम्ही पनीर भूर्जी खाल्ली आहे का? हो, पनीर भूर्जी. पनीर भूर्जी बनवायला खूप सोपी आणि तितकीच चविष्ठ वाटते. खरं तर भूर्जी हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर अंड्याची भूर्जी येते पण जे लोक शाकाहारी आहे, ते अंड्याची भूर्जी खाऊ शकत नाही. अशा लोकांसाठी पनीरची भूर्जी हा खूप चांगला पर्याय आहे. पनीरची भूर्जी चवीला अप्रतिम वाटते. ही भूर्जी कशी बनवायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असावा. त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी जाणून घ्यावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • पनीर
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • टोमॅटो
  • कढीपत्ता
  • जिरे
  • मोहरी
  • लसूण
  • लाल तिखट
  • हळद
  • धनेपूड
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : Batata Bhaji : टम्म फुगलेली बटाटा भजी कशी बनवायची? जाणून घ्या ही खास ट्रिक

कृती

  • सुरुवातीला पनीर घ्या आणि एका भांड्यात पनीरला कोमट पाण्यात भिजवू घाला
  • त्यानंतर पनीरचे बारीक किस पाडा किंवा हाताने पनीर बारीक करा.
  • त्यानंतर कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो चांगले बारीक चिरुन घ्या.
  • गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल गरम करा.
  • गरम तेलात जिरे आणि मोहरीची फोडणी घाला.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला.
  • चांगली चव येण्यासाठी त्यात कढीपत्ता घाला आणि चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक केलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका आणि चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात थोडी हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. मसाले नीट मिक्स करा
  • त्यानंतर त्यात टोमॅटो घाला आणि चांगले परतून घ्या.
  • टोमॅटो शिजल्यानंतर त्यात बारीक किसलेले पनीर टाका आणि चांगले परतून घ्या.
  • आणि थोडा वेळ पनीर भूर्जी शिजवून घ्या.
  • शेवटी पनीर भूर्जीवर कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • तुमची पनीर भूर्जी तयार होईल.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paneer bhurji recipe how to make dhaba style paneer bhurji healthy food recipe ndj
Show comments