कधीकधी अचानक पाहूणे येतात. अगदी जवळचेच असतील तर त्यांना जेवणापर्यंत थांबण्याचा आग्रह केलाच जातो. आता असं ऐनवेळी पाहुण्यांसाठी काहीतरी दमदार बेत व्हायलाच हवा ना.. अशावेळी ही भाजी अगदी परफेक्ट ठरेल. विशेष म्हणजे ही खास डिश तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. चला जाणून घेऊयात घरच्या-घरी जास्त मेहनत न घेता, फक्त १५ मिनिटांच्या आत पनीर लबाबदार कसे तयार करायचे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनीर लबाबदार साहित्य

४०० ग्राम पनीर
ग्रेव्हीसाठी तेजपान
लवंग,काळीमिरी
इलायची, तीळ
५,६ काजू
४ कांदे
२ शिमला मिरची
२ टोमॅटो
क्रश केलेले गाजर शिमला मिरची,
१ कांदा
१ टेबलस्पून बटर
१ टेबलस्पून तेल फोडणीसाठी
१/2 टेबलस्पून किचन किंग मसाला
१/२ : टेबलस्पून लाल मिरची पावडर हळदी पावडर धना पावडर गरम मसाला
चवीनुसार मीठ
२ टेबलस्पून दुधाची साय
१ टीस्पून जिरे
५ सहा लसूण पाकळ्या दोन सुक्या लाल मिरच्या

पनीर लबाबदार कृती

१. सर्वात आधी ग्रेव्हीसाठी लागणारे सगळे साहित्य तयार करून घेऊ मसाले काढून घेऊ. ग्रेव्हीसाठी कांदे शिमला मिरची कापून घ्या.आता एका कढईत सुके मसाले भाजून घेऊ. त्यानंतर पनीरचे क्यूब कट करून घ्या

२. सुके मसाले, कांदा टोमॅटो टाकून भाजून घेऊ. भाजून झाल्यावर त्यात थोडे पाणी टाकून उकळून घेऊ. उकळताना त्यात लाल मिरची, हळदी पावडर थोडा गरम मसाला, किचन किंग मसाला टाकून घेऊ. पाणी आटल्यावर गॅस बंद करून मिक्सर पॉटमध्ये ग्रेव्हीचे मसाले वाटून घेऊ.

३. आता पनीर काढून घेऊ. स्वच्छ धुऊन घेऊन पनीरचे क्यूब कट करून घेऊ आणि एका लादीचे किसणीने किस करून घेऊ

४. आता एका पॅनमध्ये बटर टाकून कट केलेले कांदे शिमला मिरची परतून घेऊ. परत त्यांना थोडे मीठ टाकून परतून घेऊ.

५. शिमला मिरची कांदा परतून झाल्यावर पनीर टाकून परतून घेऊ. आता चॉपर मध्ये शिमला मिरची गाजर कांदा क्रश करून घेऊ.भाजा परतून झाल्यावर तयार केलेली ग्रेव्ही टाकून परतून घेऊ.

६. ग्रेव्ही शिजवून घेऊ त्यात मसाले टाकून मीठ टाकून घेऊ. ग्रेव्ही शिजवून घेऊ त्यात मसाले टाकून मीठ टाकून घेऊ. गरजेनुसार थोडे पाणी टाकून घेऊ.

७. दोन चमचा साय टाकून देऊ. आता एकीकडे ग्रेव्ही उकळते दुसरीकडे भाज्या परतून तयार होत आहे. शिजल्यावर किसलेले पनीर टाकून देऊ तसेच कोथिंबीर टाकून थोडा वेळ अजून झाकण देऊन वाफ काढून घेऊन नंतर गॅस बंद करू.

हेही वाचा >> मलईदार आणि मसालेदार पनीर-आलू कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल

८. थोडा वेळ अजून झाकण देऊन वाफ काढून घेऊ नंतर गॅस बंद करू.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paneer lababdar recipe in marathi bhaji recipe bhaji recipe in marathi srk