पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्या असतील. त्यात पनीर टिक्का, पनीर क्रिस्पी, पनीर टिक्का अशा रेसिपी अनेकदा घरीही आपण बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आपल्याला सगळेच पदार्थ घरी बनवणं जमत नाही. म्हणून आज आपण घरच्या घरी झटपट बनेल अशी ‘पनीर मखाना टिक्की’ बनवणार आहोत.

पनीर मखाना टिक्की साहित्य

मखाना

दोन उकडलेले बटाटे

कांदा

शिमला मिरची

२० ते ४० ग्राम किसलेलं पनीर

१ चमचा मीठ

१ चमचा गरम मसाला

१ चमचा लाल मिरची पूड

चिरलेली कोथिंबीर

पनीर मखाना टिक्कीची रेसिपी

१. प्रथम एका बाऊलमध्ये मखाना भिजवा आणि ५ मिनिटं ठेवून द्या.

२. दोन उकडलेले बटाटे घ्या.

३. त्यात चिरलेला कांदा, चिरलेली शिमला मिरची, २० ते ४० ग्राम किसलेलं पनीर, भिजवलेला मखाना, १ चमचा मीठ, १ चमचा धनेपूड, १ चमचा गरम मसाला, १ चमचा लाल मिरची पूड, आणि चिरलेली कोथिंबीर घाला.

४. सर्व साहित्य चांगलं मिसळा आणि त्याला टिक्कीचा आकार द्या.

५. आता, मध्यम आचेवर पनीर मखाना टिक्की सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजा.

६. तुमची पौष्टिक पनीर मखाना टिक्की तयार आहे.

ही रेसिपी @khanaPeenaRecipes या इन्स्टाग्राम चॅनलवरून घेण्यात आली आहे.